Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाण्यासाठी विशेष रेल्वे; 'असे' आहे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:34 IST2025-12-04T12:33:30+5:302025-12-04T12:34:15+5:30
Mahaparinirvan Din 2025 Special Trains: चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांसाठी ही गाडी महत्त्वपूर्ण

Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला जाण्यासाठी विशेष रेल्वे; 'असे' आहे वेळापत्रक
नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईकडे होणारी प्रचंड गर्दी विचारात घेऊन दक्षिण-मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी आदिलाबाद ते दादर दरम्यान एक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी नांदेड, छत्रपती संभाजीनगर या मार्गे धावणार आहे.
५ डिसेंबर रोजी गाडी संख्या ०७१२९ ही गाडी आदिलाबाद येथून सकाळी ७ वाजता सुटणार असून, नांदेडला ही गाडी १०:४५ वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर ही गाडी पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड व कल्याणमार्गे शनिवारी पहाटे ३:३० वाजता दादर येथे पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ७ डिसेंबर रोजी गाडी संख्या ०७१३० ही गाडी दादर येथून मध्यरात्री १:०५ वाजता सुटेल आणि उपरोक्त मार्गाने सायंकाळी ६:४५ वाजता आदिलाबाद येथे पोहोचेल. या गाडीची नांदेडला पोहोचण्याची वेळ दुपारी २ वाजताची आहे.
या विशेष गाडीत १२ जनरल आणि २ एस.एल.आर. असे एकूण १४ डबे उपलब्ध असतील. चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांसाठी ही गाडी महत्त्वपूर्ण असून, या विशेष गाडीमुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.