शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

नांदेडजवळ चालकाचा ताबा सुटल्याने शिवशाही बसला अपघात; वाहकासह चारजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 1:05 PM

जखमींवर शासकीय रुग्णालय नांदेड येथे उपचार सुरु आहेत

नांदेड : नागपूर येथून नांदेडला येणाऱ्या शिवशाही बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याखाली उतरली. या घटनेत वाहकासह चार प्रवासी जखमी झाले असून ही घटना बुधवारी पहाटे सव्वासहा वाजेच्या सुमारास नांदेड नजीक असलेल्या  महादेव पिंपळगाव जवळ घडली.

बुधवारी पहाटे नागपूर ते तुळजापूर हायवे वर मौजे पिंपळगाव येथे दशमेश ढाब्याजवळ शिवशाही बस (क्र. MH 06 BW 0813 ) नागपूरकडून नांदेड येथे जात असताना चालकास डुलकी लागल्याने बसवरील नियंत्रण जाऊन रोडचे बाजूला असलेले साइन बोर्डचे खांबाला धडकून अपघात झाला. यामध्ये श्याम कृष्णराव डोरे, वय 49 रा. बांगर नगर यवतमाळ , नामदेव यशवंतराव कावळे (वाहक) वय 29 रा. नागपूर हे गंभीर जखमी झाले आहेत तसेच कैलास शेळके (चालक शिवशाही बस) वय 41 रा.चिंचोली, दिग्रस जि यवतमाळ, राम कृष्णराव डोरे वय 53 रा. बंगरनगर  यवतमाळ हे किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. 

घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी  जखमींना शासकीय जिल्हा रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल केले. त्यानंतर वाहतुक सुरळीत केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विभाग नियंत्रक अविनाश कचरे आणि नांदेडचे आगार व्यवस्थापक व्यवहारे यांनी  घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शासकीय रुग्णालय गाठून जखमींना मदत केली. या अपघातात एसटीचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेडstate transportएसटी