शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

शिवसेनेचा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकला : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 19:04 IST

धनंजय मुंडे, संजय राठोड अशा प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे.

नांदेड : शिवसेनेचा वाघ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकला आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे सध्या मवाळ झाले आहेत. अनेक निर्णयांत त्यांना तडजोड करण्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरे खूप दूर निघून गेले आहेत; परंतु अजूनही वेळ गेली नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे खरे वारसदार असाल तर शिवशक्ती-भीमशक्तीचे त्यांचे स्वप्न पूर्ण करा आणि बॅक टू पॅव्हेलियन या, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला.

केंद्रीय मंत्री आठवले हे मंगळवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी आठवले म्हणाले, ‘‘धनंजय मुंडे, संजय राठोड अशा प्रकरणांमुळे सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल; परंतु अशा प्रकरणामुळे तीन पायांचे हे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही. काँग्रेसनेही आता नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्ष केले आहे. ते कुणालाही भीक घालणार नाहीत. सत्तेत जर काँग्रेसला न्याय मिळत नसेल तर त्यांनी लगेच बाहेर पडावे. या सरकारमधून सर्वप्रथम काँग्रेसच बाहेर पडेल अशी भविष्यवाणीही आठवले यांनी केली.

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन थांबले पाहिजे. एवढे दिवस अशाप्रकारे आंदोलन करणे योग्य नाही. नामांतराच्या वेळी आम्हीही आंदोलन केले होते; परंतु काही वेळेला दोन पावले मागे आलो होतो. सरकार चर्चेसाठी तयार आहे; परंतु आंदोलकांचे नेते कायदाच मागे घेण्याच्या अटीवर ठाम आहेत. त्यामुळे हा कायदा मागे घेतल्यास अशाचप्रकारे इतर कायदे मागे घेण्याची मागणी जोर धरू शकते आणि लोकशाहीसाठी हे घातक असल्याचे ते म्हणाले.

आंबेडकरी राजकारणासाठी युती आवश्यकचरिपब्लिकन ऐक्यासाठी सर्व नेते तयार होत नाहीत. मी बाळासाहेब आंबेडकरांना अनेक वेळा त्यासाठी साद घातली; परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बाळासाहेबांचा वंचितचा प्रयोग चांगला होता. लोकसभेत त्यांना भरभरून मतेही मिळाली; परंतु लोकसभेत आणि विधानसभेत त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. एकूण राजकीय परिस्थिती पाहता स्वत:च्या ताकदीवर निवडून येणे शक्य नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळीला युती करूनच निवडणुका लढवाव्या लागतील. त्यासाठी नव्या पिढीने सकारात्मक राजकारण करण्याची गरज असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस