शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौरपदी सतीश देशमुख बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:33 IST

महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सतीश देशमुख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला असून त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

ठळक मुद्देमहापालिका : देशमुख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड : महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सतीश देशमुख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला असून त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. २४ जुन रोजी ही निवड प्रक्रिया होणार आहे.महापालिकेच्या उपमहापौर पदाचा विनय गिरडे यांनी राजीनामा दिला. काँग्रेसच्या सव्वा वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार महापौर आणि उपमहापौरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. १ जून रोजी महापौर पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. उपमहापौरपदाची निवडणूक २४ जून रोजी होणार आहे.या निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याचा २० जून ही शेवटची मुदत होती. या मुदतीत गुरुवारी काँग्रेसचे सतीश देशमुख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला आहे. काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार देशमुख यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी दिक्षा धबाले, सभापती फारुख अली खान, सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, नागनाथ गड्डम, संजय मोरे आदींची उपस्थिती होती. २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभा घेतली जाणार आहे. या सभेत निवडीची औपचारिक घोषणा होणार आहे.पाटील-देशमुख स्पर्धेत देशमुख ठरले वरचढउपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून सतीश देशमुख यांच्यासह प्रशांत तिडके पाटील यांचे नाव आघाडीवर होते. लोकसभा निवडणुकीत पाटील- देशमुख हा मुद्दाही महत्वाचा ठरला. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने देशमुखांना उपमहापौर पदाची संधी दिल्याचे सांगितले जात आहे. या सर्व स्पर्धेत प्रशांत तिडके मागे राहिले. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचाच आदेश नांदेडमध्ये अंतिम आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा