शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव ग्रा़ पं ची जमीन हस्तांतरण प्रकरणातील सहभागीविरूद्ध गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:26 IST

आमदार वसंतराव चव्हाण हे नायगावचे सरपंच असताना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन स्वत:च्या अधिकारात भाडेपट्ट्यावर हस्तांतरित केली होती.

औरंगाबाद : आमदार वसंतराव चव्हाण हे नायगावचे सरपंच असताना त्यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन स्वत:च्या अधिकारात भाडेपट्ट्यावर हस्तांतरित केली होती.या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे निर्देश न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. मंगेश पाटील यांनी दिले आहेत. सदर जमिनीच्या हस्तांतरणाकरिता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यासंदर्भातील मूळ रेकॉर्ड २७ मार्च २०१९ रोजी खंडपीठात सादर करण्याचा आदेश खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणी वेळी नांदेड जिल्हा परिषदेला दिला होता.आ. वसंतराव चव्हाण सरपंच असताना त्यांनी नांदेड-हैदराबाद महामार्गावरील ग्रामपंचायतीच्या मालकीचा जुना गट क्रमांक ४३९ व सर्व्हे क्रमांक १२६ या २ हेक्टर ४१ आरमध्ये भूखंड पाडून निवासी आणि व्यावसायिक उद्देशासाठी ३३ वर्षांच्या कराराने वार्षिक २०० रुपये भाडेतत्त्वावर स्वत:च्या अधिकारात संबंधितांच्या नावे हस्तांतरित केले होते, असे करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही.मुंबई ग्रामपंचायत अधिनियम ५५ आणि ५६ नुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांची परवानगी अनिवार्य असताना विनापरवानगी विक्री केल्याने त्याविरोधात नायगाव बाजार येथील रघुनाथ तुकाराम सोनकांबळे यांनी अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे.सोनकांबळे यांनी १३ फेब्रुवारी २०१८ रोजी पोलिसांत तक्रार दिली. विशेष पोलीस महानिरीक्षकांना २१ फेब्रुवारीला निवेदन दिले; परंतु त्यावर कारवाई झाली नाही, म्हणून त्यांनी खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे.या प्रकरणात अ‍ॅड. चंद्रकांत थोरात यांना अ‍ॅड. राहुल गारुळे सहकार्य करीत आहेत. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, आ. चव्हाण यांच्यातर्फे अ‍ॅड. विलास सावंत आणि नगर परिषदेतर्फे अ‍ॅड. अनिल एम. गायकवाड काम पाहत आहेत.३३ वर्षांचा करारआ. वसंतराव चव्हाण सरपंच असताना त्यांनी नांदेड-हैदराबाद महामार्गावरील ग्रामपंचायतीच्या मालकीचा जुना गट क्रमांक ४३९ व सर्व्हे क्रमांक १२६ या २ हेक्टर ४१ आरमध्ये भूखंड पाडून निवासी आणि व्यावसायिक उद्देशासाठी ३३ वर्षांच्या कराराने वार्षिक २०० रुपये भाडेतत्त्वावर स्वत:च्या अधिकारात संबंधितांच्या नावे हस्तांतरित केले होते, असे करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांची परवानगी घेतली नाही.

टॅग्स :NandedनांदेडAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठgram panchayatग्राम पंचायत