सकल मराठा समाजाच्यावतीने निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:18 AM2021-05-11T04:18:43+5:302021-05-11T04:18:43+5:30

ज्वारीची काढणी सुरू भोकर- तालुक्याच्या विविध भागात सध्या मळणी यंत्रणाद्वारे ज्वारीची काढणी सुरू आहे. काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी ...

Protest on behalf of the entire Maratha community | सकल मराठा समाजाच्यावतीने निषेध

सकल मराठा समाजाच्यावतीने निषेध

Next

ज्वारीची काढणी सुरू

भोकर- तालुक्याच्या विविध भागात सध्या मळणी यंत्रणाद्वारे ज्वारीची काढणी सुरू आहे. काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ज्वारीला त्याचा फटका बसला. या आठवड्यात ज्वारीची कापणी करुन शेतकऱ्यांनी ती वाळवत ठेवली होती. पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मळणी यंत्राच्या सहाय्याने ज्वारीची काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली.

९५ टक्के लसीकरण

किनवट- प्राथमिक आरोग्य केंद्र देहली अंतर्गत येणाऱ्या मौजे दहेली येथे ९५ टक्के कोरोना प्रतिबंधक लसीचे काम पूर्ण झाले. सरपंच राकेश तोटावाड, उपसरपंच प्रमोद काळे, आरोग्य सेविका कटकमवार, काळे मॅडम यांनी गावात जनजागृती करुन लसीकरण केले. गावात ९५ टक्के लसीकरण झाल्याची माहिती सरपंच तोटावाड यांनी दिली. या मोहिमेत अंगणवाडी सेविका सुलोचना कमटलवार, प्रतिभा पाटील, लता लोंढे, सुनीता बोंतावार, ललिता कचरे यांनीही सहभाग नोंदविला.

वीज पडून मृत्यू

लोहा- तालुक्यातील भुलयवाडी येथील सोनेराव संजय चव्हाण (वय १७) याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. शेतामध्ये कांदे काढणीचे काम संजय करीत असताना ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

रुग्णवाहिका भेट

मालेगाव- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका मिळाली आहे. जि.प. सदस्या संगीता अटकोरे यांच्याकडे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.आर. धनगे यांनी रुग्णवाहिकेची मागणी केली होती. अटकोरे यांनी पाठपुरावा केला होता. याप्रसंगी अनिल इंगोले, उपसरपंच मनोहर खंदारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.आर. धनगे, अमर नाईक आदी उपस्थित होते.

५०० जणांचे लसीकरण

उमरी- १८ वर्षे वयोगटातील सुमारे ५०० जणांचे लसीकरण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मारोती चव्हाण यांनी दिली. ६ मे रोजी उमरी ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा शुभारंभ झाला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष कदम, डॉ. अर्जुन शिंदे यांचीही उपस्थिती होती.

कोविड सेंटर सुरू करा

किनवट- तालुक्यातील शिवणी येथे कोविड सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी सरपंच लक्ष्मीबाई डुडुळे यांनी केली आहे. एखादा गंभीर कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्या रुग्णालयात किनवटला पाठवावे लागते. त्यामुळे शिवणीला कोविड सेंटर सुरू करण्याची गरज डुडुळे यांनी व्यक्त केली.

रस्त्याची दूरवस्था

देगलूर- देगलूर ते हनुमान हिप्परगा या ५ किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने जीवघेणी कसरत करावी लागत आहे. वारंवार अपघात घडत आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. तालुक्यातील शहापूर, सुंडगीर, हावरगा, नरंगल, मंडगी, सांगवी उमर, मेदनकल्लूर, शेळगाव, शेवाळा, आलूर या गावचे नागरिक ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात.

१० विक्रेत्यांविरुद्ध कारवाई

नांदेड- सिडको परिसरातील जवळपास १० प्रतिष्ठानांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना दंड ठोठावण्यात आला. जवळपास ३ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. पथक प्रमुख रमेश चवरे, गिरीश काठीकर, पुरुषोत्तम कामतगीरकर, रतीश टुटेजा, गजानन ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी ही कारवाई केली.

चढ्या दराने खताची विक्री

देगलूर- तालुक्यातील हाणेगाव परिसरात सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरुवात झाली. काही कृषी केंद्रावर चढ्या दराने खताची विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतकरी भरडला जात आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे व्यापारी लूट करीत असल्याने शेतकरी संतप्त झाला. कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Protest on behalf of the entire Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.