शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

पवित्र रमजान महिन्यात घरातच नमाज अदा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST

पवित्र रमजान महिन्‍यात मुस्लिम समाजामध्‍ये मोठया संख्‍येने मशिदीमध्‍ये जाऊन सार्वजनिकरित्‍या नमाज अदा करण्‍याची प्रथा आहे. या कालावधित मुस्लिम समाज ...

पवित्र रमजान महिन्‍यात मुस्लिम समाजामध्‍ये मोठया संख्‍येने मशिदीमध्‍ये जाऊन सार्वजनिकरित्‍या नमाज अदा करण्‍याची प्रथा आहे. या कालावधित मुस्लिम समाज बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. कोरोना विषाणूंचा संसर्ग लक्षात घेता पवित्र रमजान महिन्‍यात मुस्लिम बांधवांनी आपले नियमित नमाज पठण, तरावीह तसेच सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्‍या घरातच साजरे करावेत. याचबरोबर पुढील बारा सुचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी एकावेळी पाचपेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींनी एकत्र न येता सोशल डिस्‍टन्‍सींग व स्‍वच्‍छेतच्‍या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन पवित्र रमजान महिना अत्‍यंत साधेपणाने साजरा करावा.

सेहरी व इफ्तारच्‍या वेळी अनेक फळ व इतर अन्‍नपदार्थ विक्रेते यांच्याकडे गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्‍याअनुषंगाने स्‍थानिक प्रशासनाने याबाबत योग्‍य ती उपाययोजना करावी.

कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्‍ये दुवा पठणाकरीता एकत्र जमू नये. आपापल्‍या घरातच दुवा पठण करावे.

शब-ए-कदर ही पवित्र रमजान महिन्‍याच्‍या २६ व्‍या दिवशी साजरी करण्‍याची प्रथा आहे. या निमित्‍ताने मुस्लिम बांधव तरावीह संपल्‍यानंतर आपल्‍या विभागातील मशिदीमध्‍ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात. परंतू यावर्षी सर्व मुस्लिम बांधवांनी सदर धार्मिक कार्यक्रम आपापल्‍या घरात राहूनच करावेत.

पवित्र रमजान महिन्‍यात बाजारामध्‍ये सामान खरेदीकरीता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असल्‍यास त्‍याचे तंतोतंत पालन करण्‍यात यावे.