शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ २८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:35 IST

जिल्ह्यात आजघडीला केवळ २८ टक्के जलसाठा शिल्लक असून याच जलसाठ्यावर जून-जुलैपर्यंत पाणीप्रश्न सोडवावा लागणार आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : पाणीप्रश्न सोडवताना प्रशासनाची कसरत

अनुराग पोवळे।नांदेड : जिल्ह्यात आजघडीला केवळ २८ टक्के जलसाठा शिल्लक असून याच जलसाठ्यावर जून-जुलैपर्यंत पाणीप्रश्न सोडवावा लागणार आहे. पाणीप्रश्न सोडवताना प्रशासनाची मोठी कसरत होणार असून नागरिकांनाही आतापासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.जिल्ह्यात १०७ प्रकल्प असून २ मोठे प्रकल्प आहेत, ९ मध्यम प्रकल्प, ४ उच्चपातळी बंधारे, ८८ लघु प्रकल्प आणि ४ कोल्हापुरी बंधारे आहेत. या प्रकल्पातील सर्वाधिक जलसाठा हा विष्णूपुरी प्रकल्पात आहे. आजघडीला विष्णूपुरीत ५२.२० टक्के तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार प्रकल्पात २९.६९ टक्के जलसाठा आहे. मानार प्रकल्पात ४१.०३ दलघमी तर विष्णूपुरी प्रकल्पात ४२.१७ दलघमी पाणीसाठा आहे.जिल्ह्यात असलेल्या ९ मध्यम प्रकल्पाची स्थितीही जेमतेमच आहे. या प्रकल्पामध्ये ३१.३६ दलघमी साठा आहे. या पाण्याची टक्केवारी २२.५५ इतके आहे. जिल्ह्यात ४ उच्च पातळीचे बंधारे असून आजघडीला त्या बंधाऱ्यात २०.२५ टक्के म्हणजेच ३७.०६ दलघमी जलसाठा आहे. लघुप्रकल्पात २९.६८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ८१.२२ दलघमी क्षमतेच्या ८८ लघुप्रकल्पात ५७.३७ दलघमी पाणी शिल्लक आहे.नांदेड पाटबंधारे मंडळात असलेल्या १४६ प्रकल्पांची परिस्थिती पाहिली असता पाटबंधारे मंडळात केवळ २५.२७ टक्के जलसाठा आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३० प्रकल्पात केवळ ४.५७ टक्के जलसाठा असून ४३.२७ दलघमी पाणी उपलब्ध आहे. त्यामध्ये यलदरी प्रकल्पात २१.३१ दलघमी म्हणजेच केवळ २ टक्के तर सिद्धेश्वर प्रकल्पात ६.५४ दलघमी अर्थात ८.०८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. विष्णूपुरीतील पाणी संपल्यानंतर पर्याय म्हणून यलदरी आणि सिद्धेश्वर प्रकल्पाकडे मागील काही वर्षांपासून पाहिले जात होते. आता हे प्रकल्पही कोरडे पडले आहे. इसापूर प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ४२२.६६ दलघमी आहे.ही बाब नांदेडसाठीही समाधानकारक आहे. निम्म्या नांदेड जिल्ह्याला इसापूर प्रकल्पातून पाणी उपलब्ध होते. गतवर्षी हा प्रकल्प कोरडा पडल्याने जिल्ह्यात सिंचनाला पाणी मिळाले नव्हते. यावर्षी इसापूर प्रकल्प क्षेत्रातील सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. त्याचवेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सदरील भागांना भेडसावणार नाही, ही बाब स्पष्ट आहे. परभणी जिल्ह्यातील ८ प्रकल्पात १४ टक्के जलसाठा शिल्लक असून केवळ ६ दलघमी पाणी येथे उपलब्ध आहे. एकूणच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नांदेड, लोहा, कंधार, नायगाव यासह अन्य तालुक्यांनाही भेडसावणार आहे.कोल्हापुरी बंधारे कोरडेठाकजिल्ह्यात असलेल्या चार कोल्हापुरी बंधाऱ्यात एक थेंबही पाणी शिल्लक नाही. जानेवारीमध्येच ही अवस्था आहे. पावसाळ्यानंतर किमान चार महिने तरी या बंधाऱ्यात पाणी शिल्लक रहावे, अशी अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने या बंधाऱ्याचा एक टक्काही उपयोग होत नाही. बंधाऱ्याचे दरवाजेच नसल्याने पाणी अडणार कसे? कोल्हापुरी बंधाऱ्याना दरवाजे नसल्याने या बंधाऱ्याचा मूळ उद्देशच साध्य होत नाही. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेता वाया जाणा-या एका-एका थेंबाला अडविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

टॅग्स :NandedनांदेडDamधरणWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाई