शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एक पाऊल पुढे ! शेतक-यांची मुले देत आहेत सोशल मीडियातून आधुनिक शेतीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 13:51 IST

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियामुळे माहितीची देवाणघेवाण वाढली आहे़ या माध्यमाचा शेती व शेतक-यांसाठी फायदा व्हावा आणि आधुनिक शेती, शेतीपुरक व्यवसाय, इतर राज्ये, देशातील शेतीसंदर्भातील माहिती मराठी शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न कृषी पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी ‘कृषिसमर्पण’ या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून करीत आहेत.

ठळक मुद्देशेतीसंदर्भातील माहिती मराठी शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न कृषी पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी ‘कृषिसमर्पण’ या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून करीत आहेत़ शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कृषी पदवीधर, उच्चशिक्षित प्रगतशील व प्रयोगशील तरुणांनी संघटित होऊन कृषिजनसेवेसाठी पुढाकार घेतला आहे़

- श्रीनिवास भोसले

नांदेड : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियामुळे माहितीची देवाणघेवाण वाढली आहे़ या माध्यमाचा शेती व शेतक-यांसाठी फायदा व्हावा आणि आधुनिक शेती, शेतीपुरक व्यवसाय, इतर राज्ये, देशातील शेतीसंदर्भातील माहिती मराठी शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न कृषी पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी ‘कृषिसमर्पण’ या फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून करीत आहेत़ 

शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कृषी पदवीधर, उच्चशिक्षित प्रगतशील व प्रयोगशील तरुणांनी संघटित होऊन कृषिजनसेवेसाठी पुढाकार घेतला आहे़ केवळ शेतीच नाही तर जगातील सगळीच क्षेत्रे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारली आहेत़ शेतीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन कृषिसमर्पण टीम करीत आहे़ आधुनिक, शेतीपूरक व्यवसाय अथवा कृषीसंदर्भात इतर विषयांवर शक्य असेल ती सर्व मदत शेतक-यांना वेळेत मिळत असल्याने हा समूह शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा बनत आहे.

हंगामनिहाय पीक लागवड, लागवड पद्धती, बेण्याची निवड, आंतरपीक, रोगनियंत्रणासाठी उपाय, अवजारांचा वापर, पाणी, शेणखत, खत आदींचा परिस्थितीनुसार कसा वापर करावा आदीसंदर्भात माहिती दिली जाते़ शेती व्यवसायात ‘काय पिकतंय यापेक्षा बाजारामध्ये काय विकतंय’ याला खूप महत्त्व असल्याने यापुढे शेतमालाचा व्यापार, अन्नप्रक्रिया, शेतीपूरक जोडधंदे, परदेशी भाजीपाला-फळबाग लागवड, शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानावर भर देताना सोशल मीडियामधील साधनांचा प्रभावी वापर या तरूणांकडून सुरू आहे़ 

नांदेड, हिंगोलीच्या युवकांचा सहभागअहमदनगर जिल्ह्यातील विळद घाट येथील प्रा. डॉ. विनायक शिंदे-पाटील यांनी जवळपास तीन वर्षांपूर्वी या ग्रूपची स्थापना केली़ त्यांच्यासमवेत कृषीचे शिक्षण घेणारे श्रीनिवास खंदारे-पाटील वसमत, हिंगोली, सागर वाघ-नाशिक,  पुरुषोत्तम परळकर -बीड, स्वप्निल सावरकर - अमरावती, दिनेश माळी -नंदुरबार, चैतन्य जोशी-सोलापूर, योगेश गोळे - पुणे, कल्पेश पाटील -जळगाव, भूषण महाकाळ - बुलढाणा आणि उच्चशिक्षित व प्रयोगशील शेतकरी  नौशाद खान - नांदेड,  संदीप राठोड, औरंगाबाद, धनंजय येलगट्टे, लातूर, बालचंद घुनावत हे सदस्य तर डॉ. सारिका वांद्रे या महिला विभागाच्या प्रबंधक म्हणून काम पाहत आहेत.  

चाळीस हजारांवर सदस्यदिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर वाढत आहे. यात शेतकरीही मागे राहिला नाही, परंतु याचा योग्य उपयोग करीत कृषीसमर्पण टीमने शेतक-यांना माहितींचा खजिना उपलब्ध करून दिला आहे.  राज्यभरात ४० हजारांहून अधिक सदस्य असून यासाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही़  - श्रीनिवास खंदारे पाटील, सदस्य

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाNandedनांदेड