शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

आदिवासींचे जीवनमान उंचावण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:37 AM

जल-जमीन-जंगल यांचा मालक असलेल्या आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्याची गरज असून त्यासाठी वन-उपोज गौण खनिज गोळा करून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार गावपातळीवर करण्याचा हक्क या समाजघटकास बहाल करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी केले़

ठळक मुद्देजवरला गावाला भेट : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कमांडवी (जि़नांदेड) : जल-जमीन-जंगल यांचा मालक असलेल्या आदिवासी यांचे जीवनमान उंचावण्याची गरज असून त्यासाठी वन-उपोज गौण खनिज गोळा करून त्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार गावपातळीवर करण्याचा हक्क या समाजघटकास बहाल करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी़ विद्यासागर राव यांनी केले़राज्यपाल विद्यासागर राव यांनी ११ फेब्रुवारी रोजी गावातील जल शुद्धीकरण सयंत्र, बिरसा मुंडा सांस्कृतिक भवन, दालमील, शबरी घरकुलाचे उद्घाटन तर जवरला-मांडवी रस्ता व ग्रामीण क्रीडा संकुल उभारणीचे भूमिपूजन केले़ग्रामस्थांशी संवाद साधताना राज्यपाल यांनी आपण पहिल्या गाव भेट दौ-यात प्रस्तावित केलेल्या जवळपास सर्वच कामांची पूर्तता झाली असल्याचे व निजामकालीन राजवटीतला जवरला-आंबाडी-किनवट हा जुना रस्ता नव्याने तयार करून या गावास जोडण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ निधीची कमतरता पडू देणार नाही़ पाण्याची बचत आणि त्याचा वापर याची पुरेपूर माहिती अवगत करून देण्यासाठी लवकरच पाणी फाऊंडेशनचे एक पथक येथे पाठविणार आहे़ यासंबंधी सिनेअभिनेता आमिर खान यांच्याशी माझे बोलणे झाले आहे़ मोबाईल क्रांती आणि त्याचा अतिरेक हे एका उदाहरणातून त्यांनी मांडले़ आदिवासींच्या सर्वांगीण विकासाकरिता ५ कोटींमधील ५ टक्के रक्कम आता थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा होणार आहे़ असे सांगून आदिवासी गाव दत्तक प्रक्रियेतून मला त्यांच्या गरजा आणि समस्या या जवळून पाहता आल्याचा निर्वाळा दिला़जवरला परिसरातील जवळपास २ हजार एकर पर्यंत सिंचनाच्या सुविधा नसल्याने शेती फायदेशीर ठरत नाही़ ही गरज ओळखून प्रशासनाने या भागात सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी दोन- तीन पर्याय असलेले सविस्तर प्रस्ताव तयार करावेत़ त्याला मंजुरी देवून सिंचनासाठी फायदेशीर मार्ग अवलंबला जाईल, असेही त्यांनी सांगितले़ याप्रसंगी मंचावर राज्यपालांसमवेत वेणू गोपालरेड्डी, प्रा़ प्रदीप नाईक, रंजित कुमार, उल्हास मुडेकर, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, सरपंच भूपेंद्र आडे, महाजन माधव मरसकोल्हे, जि़प़ उपाध्यक्ष समाधान जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, तहसीलदार नरेंद्र देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ उपस्थित होते़प्रास्ताविक माधवराव पाटील यांनी केले़ प्रारंभी आदिवासी मुलींचे विद्यासंकुल पिंपळगाव येथील मुलींच्या नृत्यगीताने स्वागत झाले़राज्यपालांनी केले विकास कामांचे उद्घाटनराज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले़ विशेष केंद्रीय सहाय योजनेतून २ लाख रूपये अनुदानातून जंगुबाई आदिवासी महिला शेतकरी गटाने सुरू केलेल्या दालमिलचे उद्घाटन करण्यात आले़ ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून ७ लाख ५० हजार रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचे तसेच २ कोटी ९५ लाख रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले़ ९९ लाख ६२ हजार रूपयांच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे तसेच मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले़किनवट तालुक्यातील आदिवासीबहुल जवरला हे गाव २९ मे २०१५ रोजी राज्यपालांनी गावसंवाद कार्यक्रमात हे गाव विकासाकरिता दत्तक घेतल्याचे जाहीर केले़ तेव्हापासून येथे कोणकोणती विकासकामे पूर्णत्वास गेली याची पाहणी करण्यात आली़४खेळीमेळीच्या वातावरणात रिमझिम पावसाच्या गारव्यात अर्धा-पाऊण तास राज्यपालांचा संवाद कार्यक्रम चालला होता़४हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि राज्यपालाच्या आगमनानंतर ११़३० वाजता पावसाच्या सरी बरसल्या़यामुळे उपस्थितांची चांगलीच धांदल उडाली़