- गोविंद कदमलोहा (नांदेड): नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत दहावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. भागवत श्यामसुंदर शिंदे (रा. जानापुरी, ता. लोहा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सध्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असतानाच काळाने या विद्यार्थ्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
रस्ता ओलांडताना ट्रकने चिरडलेमिळालेल्या माहितीनुसार, भागवत शिंदे सोमवारी सायंकाळी आपल्या दुचाकीवरून (MH 26 CS) घराकडे निघाला होता. खरबी फाटा येथून रस्ता ओलांडून तो जानापुरीकडे जात असताना, नांदेडकडून लातूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने (CG 08 CX 9272) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की भागवतचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
परीक्षेच्या दिवसातच घातभागवत हा दहावीचा विद्यार्थी होता आणि सध्या त्याच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होत्या. परीक्षेचा अभ्यास आणि भविष्यातील स्वप्ने उराशी बाळगून असतानाच हा अपघात घडला. एका होतकरू विद्यार्थ्याच्या निधनाने जानापुरी गावावर आणि त्याच्या शालेय मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.
पोलीस कारवाईघटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला असून, अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली आहे. याप्रकरणी सोनखेड पोलीस पुढील तपास करत आहेत.
Web Summary : A 17-year-old student, Bhagwat Shinde, died in a highway accident near Nanded-Latur. A speeding truck hit his motorcycle while he was returning home from Kharbi Phata. The tenth-grader was on his way home during board exams.
Web Summary : नांदेड-लातूर राजमार्ग के पास एक सड़क दुर्घटना में 17 वर्षीय छात्र भागवत शिंदे की मौत हो गई। खरबी फाटा से घर लौटते समय एक तेज रफ्तार ट्रक ने उसकी मोटरसाइकिल को टक्कर मार दी। दसवीं का छात्र बोर्ड परीक्षा के दौरान घर जा रहा था।