शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

नांदेड जि़प़ चा शिक्षक गौरव सोहळा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:31 IST

जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा जिल्ह्यातील ३३ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या वतीने तयारीही सुरू करण्यात आली होती. मात्र पुरस्कारार्थी शिक्षकांच्या याद्यांचा तिढा न मिटल्याने हा पुरस्कार लांबणीवर टाकण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली आहे.

ठळक मुद्दे३३ शिक्षकांची निवड : पुरस्कारार्थी शिक्षकांच्या यादीचा तिढाच सुटेना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा जिल्ह्यातील ३३ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या वतीने तयारीही सुरू करण्यात आली होती. मात्र पुरस्कारार्थी शिक्षकांच्या याद्यांचा तिढा न मिटल्याने हा पुरस्कार लांबणीवर टाकण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली आहे.शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक गौरव सोहळा घेवून यात जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. मध्यंतरी ही परंपरा विस्कळीत झाली होती. सलग दोन वर्षे पुरस्कार वितरण सोहळे न घेतल्याने शिक्षकांसह समाजातील इतर घटकांतूनही नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शिक्षण विभागाने पुढाकार घेवून तीन वर्षांतील शिक्षक पुरस्काराचे एकाचवेळी वितरण केले होते. त्यानंतर यंदापासून हा पुरस्कार वितरण सोहळा सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती.यंदा या पुरस्कारासाठी जिल्ह्यातून ८६ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यातील ५४ प्रस्ताव शिक्षण विभागाच्या पडताळणीतच बाद झाले. उर्वरित ३६ प्रस्तावांतून शिक्षकांची निवड करायची होती. जिल्हा निवड समितीकडून हे प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठीही पाठविले. मात्र ही प्रक्रिया वेळेत पार न पडल्याने यंदा पुरस्कार वितरणाचा ५ सप्टेंबरचा मुहूर्त टळला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी शासनाचा निधी नसतो तर यासाठीचा खर्च सेस फंडातून केला जातो. पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या शिक्षकांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक कार्यालयातून द्यावे लागते. या सर्व प्रक्रियेत वेळ गेल्याने ५ सप्टेंबर रोजीचे वितरण लांबणीवर टाकण्याची नामुष्की प्रशासनावर आली.दरम्यान, येत्या १३ सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा घेण्याबाबत प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.मनपाचे गुरुगौरव आणि कार्यगौरव पुरस्कार जाहीरनांदेड महानगरपालिकेच्या वतीने १५ प्राथमिक व २ माध्यमिक शाळा चालविले जातात. मनपाच्या वतीने यंदाही मनपास्तरीय गुरुगौरव आणि कार्यगौरव पुरस्कारांची निवड करण्यात आली असून हा पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत होणार आहे. यावर्षी मराठी माध्यमातून मारोती चंद्रराव कांबळे, साईनाथ सुधाकर चिद्रावार, उर्दू माध्यमातून संजीदा मुजम्मील गफूर, अब्दुल गणी मो. इमामोद्दीन तर कार्यगौरव पुरस्कारासाठी उर्दू माध्यमातून शेख रहीम शेख अहेमद आणि मराठी माध्यमातून गोदावरी राजेंद्र गज्जेवार यांची निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :NandedनांदेडTeacherशिक्षकNanded zpनांदेड जिल्हा परिषदEducationशिक्षण