शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रबोधनाचा बुलंद आवाज हरपला! हभप मधुकर महाराज बारूळकर यांचा भीषण अपघातात अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:05 IST

शिवकुटुंब मेळावा आटोपून गावी जाताना काळाचा घाला; ढवळे कॉर्नर परिसरात अपघात

नांदेड: ज्येष्ठ शिवव्याख्याते, पुरोगामी विचारवंत तथा प्रबोधनकार हभप मधुकर महाराज बारूळकर (वय ५४) यांचा मंगळवारी सायंकाळी नांदेड येथील ढवळे कॉर्नर परिसरात झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. एका भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदाय आणि बहुजन चळवळीचे मोठे नुकसान झाले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाराज हे बारूळ येथील विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मंदिर संस्थानचे अध्यक्ष म्हणून कार्य पाहत होते.

शिवकुटुंब मेळावा ठरला शेवटचा कार्यक्रमनांदेड येथे आयोजित करण्यात आलेला 'शिवकुटुंब मेळावा' आटोपून मधुकर महाराज बारूळकर हे आपल्या दुचाकीने बारूळकडे निघाले होते. ढवळे कॉर्नर परिसरात पोहोचले असता, पाठीमागून आलेल्या एम.एच. २६-सी.एच. ४३८६ या क्रमांकाच्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की महाराजांचा जागीच अंत झाला. त्यांच्या जाण्याने समाज प्रबोधनाचे एक पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

सुशिक्षित आणि कर्तृत्ववान परिवारहभप मधुकर महाराज बारूळकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांनी आपल्या मुलांना उच्चशिक्षित करून समाजाच्या सेवेत रुजू केले होते. त्यांचा एक मुलगा पोलीस उपनिरीक्षक, दुसरा विक्रीकर निरीक्षक तर मुलगी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बारूळ (ता. कंधार) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रबोधन क्षेत्राची मोठी हानीपुरोगामी विचारांचे कट्टर समर्थक आणि छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रचार करणारे महाराज त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जात. त्यांच्या अचानक जाण्याने नांदेड जिल्ह्यातील आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी अपघातातील टिप्परवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, शहरात अवजड वाहनांच्या वेगाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Social reformer Madhukar Maharaj Barulkar dies in tragic accident.

Web Summary : Social reformer HBP Madhukar Maharaj Barulkar died in Nanded after a speeding tipper truck hit his motorcycle. The accident took place near Dhawale Corner. His death is a great loss to the Warkari community.
टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेडDeathमृत्यू