मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे - विखे पाटील
By श्रीनिवास भोसले | Updated: June 23, 2024 17:31 IST2024-06-23T17:29:35+5:302024-06-23T17:31:26+5:30
आरक्षण आंदोलन आता भरकटत चालल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे - विखे पाटील
नांदेड: महायुती सरकारने १० टक्के आरक्षण दिले आहे. परंतु आता आंदोलन भरकटत चालले आहे. मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नव्हे, आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
मंत्री विखे पाटील मंथन बैठकीनिमित्त नांदेड येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनांबाबत विचारले असता ते म्हणाले दोन्ही समाजाबाबत सरकार स्तरावर चर्चा सुरू आहे. लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडले. त्यामुळे मार्ग निघेल असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षण आणि ओबीसीच्या मागण्यादेखील महत्वाच्या आहेत, असेही ते म्हणाले.
आरक्षणाचे आंदोलन आता भरकटत चालले आहे. आंदोलनाचं गांभीर्य कमी झालं आहे, असेही विखे पाटील म्हणाले. सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. तरीही विरोधी पक्ष वेगळी भुमिका मांडत असल्याचे विखे पाटील म्हणाले.