शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
6
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
7
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
8
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
9
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
10
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
11
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
12
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
13
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
14
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
15
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
16
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
17
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
18
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
19
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
20
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

ऐकावं ते नवलच... गावचं उपसरपंचपद १० लाखांना विकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 2:36 AM

शनिवार रात्री आठ वाजता महाटी गावच्या मारुती मंदिराच्या बाहेरील ओट्यावर गावकरी मंडळी एकत्रित जमा झाली. या ओट्यावर एक बैठक घेऊन बैठकीमध्ये उपसरपंचपदासाठी ज्यांना उभं राहायचं आहे

बारड (जि.नांदेड) : महाटी ता.मुदखेड येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या असून ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचपदाचे आरक्षणही जाहीर झाले आहे. काही गावांमध्ये तर चक्क सरपंच, उपसरपंचपद विक्री केले जात आहे. मुदखेड तालुक्यातील महाटी येथे  उपसरपंचपदासाठी गावकऱ्यांनी बोली लावली होती. यामध्ये उपसरपंचपद तब्बल दहा लाख पन्नास हजार रुपयांमध्ये विक्री करण्यात आल्याची माहिती आहे.

शनिवार रात्री आठ वाजता महाटी गावच्या मारुती मंदिराच्या बाहेरील ओट्यावर गावकरी मंडळी एकत्रित जमा झाली. या ओट्यावर एक बैठक घेऊन बैठकीमध्ये उपसरपंचपदासाठी ज्यांना उभं राहायचं आहे, निवडणूक लढवायची आहे त्याने पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार गावातील विद्यमान सरपंच प्रतिनिधी बळीराम पाटील ढगे, सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी व्यंकटराव मरोतराव ढगे, माजी सरपंच माधवराव तानाजी ढगे यांनी या बोलीत सहभाग घेतला होता. उपसरपंचपदाच्या बोलीची सुरुवात ७ लाख १ हजार रुपये ठेवण्यात आली होती. त्यानुसार बळीराम ढगे, व्यंकटराव ढगे, मारोतराव ढगे यांनी बोली लावली होती.

टॅग्स :ElectionनिवडणूकNandedनांदेड