गोरखनाथ सूर्यवंशी खून प्रकरणात दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:27 AM2018-03-15T00:27:50+5:302018-03-15T00:28:00+5:30

शहरातील पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेले गोरखनाथ किशनराव सूर्यवंशी यांनी भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी स्विफ्ट कार घेतली होती़ १० जून २०१४ रोजी अज्ञात व्यक्तीसोबत ते भाडे घेवून बोधनला जात असताना, कार चोरी करण्याच्या उद्देशाने दोघांनी गळा आवळून त्यांचा खून केल्याची घटना घडली होती़ या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोन्ही भावांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़

Gorakhnath Suryavanshi murder case gives life to both | गोरखनाथ सूर्यवंशी खून प्रकरणात दोघांना जन्मठेप

गोरखनाथ सूर्यवंशी खून प्रकरणात दोघांना जन्मठेप

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१४ ची घटना : कार चोरीचा होता आरोपींचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेले गोरखनाथ किशनराव सूर्यवंशी यांनी भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी स्विफ्ट कार घेतली होती़ १० जून २०१४ रोजी अज्ञात व्यक्तीसोबत ते भाडे घेवून बोधनला जात असताना, कार चोरी करण्याच्या उद्देशाने दोघांनी गळा आवळून त्यांचा खून केल्याची घटना घडली होती़ या गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोन्ही भावांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़
गोरखनाथ यांना शेख पाशा ऊर्फ पवन शेख राजेमोहम्मद ऊर्फ राजामियॉ याने १० जून २०१४ रोजी फोन करुन बोधनचे भाडे असल्याचे सांगितले होते़ त्यानुसार त्याच रात्री गोरखनाथ हे (एम़एच़२६, एके-१२४८) या क्रमांकाची कार घेऊन हिंगोली गेट येथे गेले होते़ त्यानंतर शेख पाशा व गोरखनाथ हे दोघेही कारने बोधनच्या रस्त्यावर लागले होते़ परंतु दुसरा दिवस उजाडला तरी, गोरखनाथ हे घरी न परतल्यामुळे कुटुंबिय चिंतेत होते़ १२ जून रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ चौकशीत गोरखनाथ यांचे कारसह अपहरण केल्याची बाब स्पष्ट झाली़ तत्कालीन पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी स्थागुशाचे पोनि श्रीधर पवार यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले होते़
पोनि पवार यांनी तपासासाठी पोउपनि शिवाजीअण्णा डोईफोडे, पोना दत्तराम जाधव, ज्ञानेश्वर तिडके, बालाप्रसाद जाधव यांची नियुक्ती केली होती़ त्याच दरम्यान पोउपनि डोईफोडे यांना भाडे ठरविणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळाली़ शेख पाशा याला बोधन येथून ताब्यात घेतल्यानंतर या खुनाचे गूढ उकलले़ या प्रकरणात शेख पाशा ऊर्फ पवन शेख राजमोहम्मद ऊर्फ राजामियॉ व त्याचा भाऊ सैलानी बाबा राजमोहम्मद ऊर्फ राजामियॉ या दोन भावांना अटक केली होती़ या प्रकरणात बुधवारी जिल्हा सत्र न्या़देशपांडे यांनी दोन्ही भावांना खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ सरकारच्या वतीने अ‍ॅडक़ागणे व कुर्तडीकर यांनी काम पाहिले़

असा रचला होता खुनाचा कट
गोरखनाथ सूर्यवंशी यांची आरोपी शेख पाशा याने काही दिवसांपूर्वी गाडी भाड्याने नेली होती़ त्यातून त्यांची ओळख झाली होती़ त्याच ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने कार चोरीचा कट रचला़ गोरखनाथ आणि शेख पाशा हे कारने बोधनकडे निघाले होते़ दोन वेळेस कारचोरीचा प्रयत्नही केला़ त्यानंतर शेख पाशा याने भाऊ सैलानीबाबा याला बिलोली येथे बोलावून घेतले़ निझामाबाद रस्त्यावर कारचा वेग कमी होताच गळा आवळल्यानंतर गोरखनाथ यांच्या अंगावरुन गाडी घातली़

Web Title: Gorakhnath Suryavanshi murder case gives life to both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.