शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तमलूर वाळू घाटावरील उपसा केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:19 IST

देगलूर तालुक्यातील तमलूर वाळू घाटावर क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा झाल्यामुळे येथील वाळू उपसा बंद करण्याचे आदेश देगलूर तहसीलदारांनी दिले आहे.

ठळक मुद्देक्षमतेपेक्षा जास्त उत्खननमहाटी, कौडगाव घाटही बंद३ जून रोजी होणार इटीएस मोजणी

अनुराग पोवळे ।नांदेड : देगलूर तालुक्यातील तमलूर वाळू घाटावर क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा झाल्यामुळे येथील वाळू उपसा बंद करण्याचे आदेश देगलूर तहसीलदारांनी दिले आहे. गेल्या चार दिवसांपासून हा वाळू घाट बंद असून ३ जून रोजी येथे झालेल्या वाळू उपशाची मोजणी केली जाणार आहे.देगलूर तालुक्यातील तमलूर येथे लेंडी नदीतील वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला होता. या ठिकाणी २ हजार ६५० ब्रास वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यात आली होती. या वाळू घाटासाठी ९४ लाख १ हजार ५०० रुपये सर्वोच्च बोली लागली होती. वाळूघाट ताब्यात दिल्यानंतर येथे नियमानुसार वाळू उपसा होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी रात्रं-दिवस जेसीबी मशिनने वाळू उपसा करीत हजारो ब्रास वाळू नेण्यात आली. येथील लाल वाळूला आंध्र, कर्नाटक या राज्यांत मोठी मागणी आहे. दररोज लाखों रुपयांचा वाळू उपसा केला जात होता.त्यासह संपूर्ण राज्यात नांदेड जिल्ह्यातील वाळूला मोठी मागणी आहे. पुणे, मुंबई, नाशिक आदी मोठ्या शहरांत वाळू नेली जात आहे. परिणामी वाळूचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.तमलूर वाळू घाटावर नियमांचे उल्लंघन करुन सुरू असलेल्या उपशाबाबत तमलूरच्या सरपंचासह अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ताब्यात दिलेल्या गटामधून उत्खनन करता दुसऱ्या गटातून उत्खनन केले जात होते. या ठिकाणी बोगस पावत्यांचाही वापर केला जात होता. परवानगीपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांद्वारे रात्रं-दिवस वाहतूक करणे आदी तक्रारी करण्यात आल्या होत्या. अखेर या तक्रारीची दखल घेत देगलूरचे तहसीलदार अरविंद बोलगणे यांनी तमलूर वाळूघाट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. चार दिवसांपासून हा वाळू घाट बंद असल्याची माहिती तहसीलदार बोलगणे यांनी दिली. या वाळूघाटावर परवानगीपेक्षा जादा वाळू उपसा झाल्याचेही ते म्हणाले. प्रत्यक्षात येथे किती वाळू उपसा झाला, याची मोजणी केली जाणार असून ३ जून रोजी ही मोजणी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, जिल्ह्यात परवानगी दिलेल्या बहुतांश वाळू घाटांवर परवानगीपेक्षा जास्त उत्खनन झाल्याची परिस्थिती आहे. उमरी तालुक्यातील कौडगाव आणि महाटी येथील वाळू घाटही प्रशासनाने क्षमतेपेक्षा अधिक उपसा झाल्यामुळे बंद करण्याची कारवाई केली आहे.बोगस पावत्यांचा वापरगौण खनिजाच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून गौण खनिज वाहतूक परवाना दिला जातो. या परवान्याशिवाय गौण खनिजाची वाहतूक शक्य नाही. मात्र आजघडीला विनापावत्याच गौण खनिजाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचवेळी ज्या पावत्या वापरात आहेत त्यातही बोगस पावत्यांचेच प्रमाण मोठे आहे. खुद्द जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मरखेल येथे सगरोळी घाटावरुन वाळू भरुन जात असलेल्या वाहनांची तपासणी केली. एक नव्हे, दोन नव्हे तब्बल २७ वाहने त्यांनी तपासली. यातील सर्व पावत्या बोगस असल्याचे उघड झाले. मात्र खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करुनही या बोगस पावत्यांच्या प्रकरणातील पुढील कारवाई मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे चौकशी होणार तरी कुठली, हा प्रश्न आहे.जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी परवानगीपेक्षा जादा वाळू उपसाजिल्ह्यात देगलूर तालुक्यातील मेदनकल्लूर घाटावर १ हजार ३२५ ब्रास उपसा करण्याची परवानगी दिली आहे. सांगवी उमर येथे १ हजार ५११, शेळगाव-२ येथे ३ हजार ७८४, बिलोली तालुक्यातील गंजगाव-२ येथे ६ हजार ५१९, कार्ला बु. येथे २ हजार १४, माचनूर येथे ६ हजार ९२६, सगरोळी येथे ३ हजार ११०, गोळेगाव येथे ३ हजार ८१६, उमरी तालुक्यातील कौडगाव येथे ३ हजार ९२, एरंडल येथे २ हजार ८६२, महाटी येथे २ हजार ८७१, नायगाव तालुक्यातील मेळगाव येथे ८ हजार ४८१, धनज येथे ६ हजार ७८४ ब्रास वाळू उपसा करण्याची परवानगी दिली होती. यातील धनजसह अन्य २ वाळू घाट लिलावातील बोलीनंतरही ठेकेदारांनी पूर्ण रक्कम न भरल्याने सुरू झाले नाहीत. अधिकृतरीत्या येथे वाळू उपसा झाला नसला तरीही प्रत्यक्षात अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडsandवाळूNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड