शेतकऱ्याला मारहाण करून लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:18 IST2021-05-11T04:18:28+5:302021-05-11T04:18:28+5:30

गोपाळनगर येथे दुचाकी लांबविली शहरातील गोपाळनगर भागात घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने लांबविली. ही घटना ११ एप्रिल रोजी घडली. संतोष ...

The farmer was beaten and robbed | शेतकऱ्याला मारहाण करून लुबाडले

शेतकऱ्याला मारहाण करून लुबाडले

गोपाळनगर येथे दुचाकी लांबविली

शहरातील गोपाळनगर भागात घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने लांबविली. ही घटना ११ एप्रिल रोजी घडली. संतोष मोहन पवार यांनी एम.एच.२६, बीएन ०३८३ या क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी केली होती. ४५ हजार रुपये किमतीची ही दुचाकी लंपास करण्यात आली. या प्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मळणी यंत्रातील साहित्यांची चोरी

अर्धापूर तालुक्यातील शहापूर येथे मळणी यंत्रातील साहित्यांची चोरी करण्यात आली. ही घटना ७ मे रोजी घडली. समाधान धारबाजी लोणे यांनी शेतातील आखाड्यावर मळणीयंत्र उभे केले होते. रात्रीच्या वेळी चोरट्याने मळणी यंत्राला लावलेली १५ हजार रुपयांची मोटार, स्टार्टर किटकॅट आणि पेटी असे १७ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. या प्रकरणात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शेतात साठा केलेली वाळू जप्त

लोहा तालुक्यातील आडगाव येथे शेतात अवैधपणे करून ठेवण्यात आलेला वाळूचा साठा जप्त करण्यात आला. महसूलच्या पथकाने ५ मे रोजी ही कारवाई केली. यावेळी २५ हजार रुपयांची सहा ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या प्रकरणात तलाठी ज्ञानेश्वर शिंदे यांच्या तक्रारीवरून लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: The farmer was beaten and robbed