शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

आजही ४५ वर्षांवरील व्यक्तींनाच लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:17 IST

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या एकूण ६ केंद्रांवर कोविशिल्ड या लसीचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रात श्री ...

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या एकूण ६ केंद्रांवर कोविशिल्ड या लसीचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्रात श्री गुरूगोविंदसिंगजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, कौठा, सिडको या हॉस्पिटलचा समावेश आहे. तर, शहरी दवाखाना दशमेश हॉस्पिटल येथे कोविशिल्डचे ५० डोस व शिवाजीनगर येथे कोविशिल्डचे ४० डोस दिले आहेत.

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. यातील रुग्णालय उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहे. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, गोकुंदा, मुखेड, हदगाव, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड अशा एकूण १४ लसीकरण केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येक केंद्रनिहाय १०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे कोविशिल्डचे ३० डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कोव्हॅक्सिनचे ३० डोस, ग्रामीण रुग्णालय माहूर येथे कोव्हॅक्सिनचे १० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविशिल्डचे प्रत्येकी १०० डोस उपलब्ध केले आहेत.

जिल्ह्यात २१ मे पर्यंत एकूण ४ लाख १३ हजार ९८८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर, २२ मे पर्यंत कोविड-१९ लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झाला आहे. कोविशिल्डचे ३ लाख ३४ हजार ९३० डोस, कोव्हॅक्सिनचे १ लाख ५ हजार ३४० डोस याप्रमाणे एकूण ४ लाख ४० हजार २७० डोस प्राप्त झाले आहेत.

हे सर्व डोस ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्याच्या १२ ते १६ आठवडे म्हणजेच सुमारे ८४ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रावर ४५ वर्षांवरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सिन ही लस ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरिता cowin.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल.