शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

Drought In Marathwada : परतीचा पाऊस गुल: दुष्काळी बनला माहोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 19:26 IST

दुष्काळवाडा : रान हिरवे दिसलं पण पीकाना अन्नद्रव्ये मिळाली नाहीत,वाढ झाली नाही. त्यामुळे पीक उतारा प्रचंड घसरण झाली.

- गंगाधर तोगरे, चिखलभोसी ता.कंधार. जि.नांदेड.

खरीप हंगामातील पिकांना परतीचा पाऊस पोषक असतो.हातातोंडाशी आलेला घास घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरतो.परंतू परतीचा पाऊस गुल झाला.आणि खरीप हंगामातील पीकांना दुष्काळात ढकलून दिला.त्यामुळे रान हिरवे दिसलं पण पीकाना अन्नद्रव्ये मिळाली नाहीत,वाढ झाली नाही. त्यामुळे पीक उतारा प्रचंड घसरण झाली. आणि सलग दुसरे वर्ष ही दुष्काळाचा सामना करण्याचा प्रंसग शेतकऱ्यावर आला आहे.

जून महिन्यात पावसाने हजेरी लावली.वेळेत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.गत वर्षीच्या दुष्काळाने होरपळून गेलेल्या शेतकऱ्यांना दिलासा वाटला.परंतु हा आंनद जास्त काळ टिकला नाही. कांही खंडानंतर होत असलेला पाऊस, वातावरणातील होणारे बदल,पीकावर होणारा रोगाचा प्रादुर्भाव आदीने शेतकरी आर्थिक गर्तेत रूतत गेला.परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दुहेरी लाभ झाला असता.खरीप पीके बहरली असती.आणि रब्बी हंगाम जोमात आला असता.पण असे घडले नाही. खरीप ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर,मुग,उडीद,आदी पीकावर परीणाम प्रभावी झाला. आर्थिक घडी पूर्णत: विस्कटून गेली.

तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८३३ मि.मी.आहे. पण सरासरी एवढा पाऊस झाला नाही.तसे परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने पीक उत्पादकता घटली.पावसाळ्यात उन्हाळा व हिवाळ्यात सुद्धा उन्हाळा अशी गत झाली. कडक उन्हामुळे पीके करपू लागली.व जमीनीला भेगा वेगाने पडू लागल्या. खरीप पेरणीपूर्व मशागत, पेरणी, निंदणी,फवारणी, खूरपणी, काढणी, वेचणी, खत आदीवर होणारा खर्च निघत नाही.सोयाबीनचा उतारा निमा घटत आहे.कापूस किमान तीन भार वेचणीचा असतो.परंतु एका वेळची वेचणी व्यवस्थित होणार की नाही याचा नेम नाही.बोंडअळीचा बिमोड करताना कृषी विभागाने बांधावर जाण्यासाठी कसर ठेवली नव्हती. ता.कृषी अधिकारी आर.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी बैनाडे, कृषी सहायक शिवाजी सुर्यवंशी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार यांनी शेतकऱ्यांना मोठे सहकार्य केले.

शेतकऱ्यांनी खरीपाची मशागत, संगोपन, श्रम,करूनही निराशा झाली.तरीही शेतकरी हार मानत नाही. हाळद लागवडीतून कमाई करण्याचा प्रयत्न चालविला आहे.परंतु हाळदीला कंदमाशी तळाला लागल्याने भलतीच पंचाईत झाली आहे. एकरी हळदीवर ७५ हजार खर्च करूनही'  हळद रूसली कंदमाशीत रूतली' अशी गत झाली आहे.हळदीचे उत्पन्न निमे होण्याचा धोका निर्माण झाला आहे.पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा होणे गरजेचे आहे.परंतु त्याचा लपंडाव हा अडचणीचा ठरत आहे.रात्री अपरात्री पाणी पीकाला देण्यासाठी जीव मुठीत धरण्याचा प्रसंग आला आहे. चिखलभोसी व परीसरात कापूस, सोयाबीन, मुग, उडीद पीकाचा उतारा घसरण मोठी आहे. अशीच स्थिती तालुक्याची आहे.तात्काळ पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी ऐरणीवर आली आहे.

उत्पन्न ४० टक्के घसरले चिखलभोसी, परिसर व तालुक्यात खरीपातील कापसाला बोंडअळीतून बाहेर काढण्यात यश आले.पण परतीच्या पावसाने दगा दिला.एकाच वेचणीवर कापुस आजघडीला आहे.खालच्या बोंडाला कापूस फूटला आहे.परंतु वरची बोंडे मात्र  शाश्वती न देणारे आहेत. उत्पन्न ४० टक्के घसरण्याची शक्यता आहे.तूर तर चिंताजनक आहे. - आर.एम.देशमुख, ता.कृषी अधिकारी, कंधार.

बळीराजा काय म्हणतो?

- यंदा खरीप पीकाची निसगार्ने पूरती वाट लावली आहे.सोयाबीन पीकाला एकरी तेरा ते चौदा हजार खर्च आला.परंतू खर्चाच्या अर्धे निघत आहे.शेती कशी करावी.असा प्रश्न आहे.शासन मात्र दुष्काळ जाहीर करण्यासाठी उत्पादकता काढण्यासाठी प्रयोग करत आहे.ही शेतकऱ्यांची चेष्टा नव्हे का? -रावसाहेब शंकर वरपडे. शेतकरी

- खरीप हंगाम सतत शेतकऱ्यांना दगा देत आहे.त्यामुळे  हाळद लागवड प्रयोग केला.मी वाटयाची शेती केली आहे.75 हजार लागवड खर्च  केला.परंतु कंदमाशीने झोप उडविली आहे.बुड रोगाने पोखरून टाकले आहे.शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून दिलासा दयावा - संतोष दादाराव वरपडे, वाटेकरी शेतकरी

- गाव खरीप शेतीवर अधिक अवलंबून आहे.पण निसर्ग पावसाच्या खेळाने शेतीचा खेळ खंडोबा होत आहे.थोडीशी शेती भिजवून आधार मिळवायला भारनियमन भार पेलवत नाही.यातून मार्ग काढावा. - आनंदा विठ्ठलराव निळेगावे, शेतकरी.

- पांढरे सोने म्हणून कापसाला शेतकरी जीवापाड जपतो.निसर्ग लहरीपणा या सोन्याच्या मानगुटीवर बसला आहे.बोंडअळी ,लाल्या व परतीचा पाऊस पडला नाही.त्यामुळे एक वेळची वेचणी खर्च सुद्धा निघू देणार नाही. हे वास्तव आहे. दुष्काळ जाहीर करारला मुहूर्त कोणता आहे.हाच प्रश्न आहे - शिवराज संभाजी किडे.शेतकरी.

- खरीपाची कसर रब्बी हंगामात काढण्याचा प्रयत्न शेतकरी करतो.पण जलसाठे नाहीत.त्यामुळे रब्बी हंगाम अडचणीत अडकला आहे.दुष्काळाचे भयावह चित्र आहे.शासनाने दुष्काळ जाहीर करावा -मुरलीधर शंकर किडे.शेतकरी.

- मागील वर्षी दुष्काळी चटक्याने शेती व्यवसाय तोटयात आला.त्यामुळे तीन एकर शेती वहीताखाली आणली नाही.शेतकरी हा निसर्ग लहरीत,भारनियमन, व शासन मदतीच्या उदासीनता यात अडकला आहे. दुष्काळ जाहीर करून सावरण्याची गरज आहे. - जयवंत किडे सरपंच तथा शेतकरी

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र