पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्ने पाहू नका; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 18:04 IST2019-02-22T17:59:01+5:302019-02-22T18:04:44+5:30

अच्छे दिन ही काही लोकांना शिवी वाटते़ कारण त्यांचे बुरे दिन सुरु झाले़ आहेत

Do not dream to come in power for the next ten years : Chief Minister Fadnavis | पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्ने पाहू नका; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना टोला

पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्ने पाहू नका; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना टोला

नांदेड : अच्छे दिन ही काही लोकांना शिवी वाटते़ ती वाटणारच कारण त्यांचे बुरे दिन सुरु झाले़ या सरकारने योजनातील दलालीही बंद केली आहे़ त्यामुळे आता रस्त्यावरचा कुत्राही तुम्हाला विचारत नाही़ हे तुमच्याच पापाचे भोग असून काळजी करु नका अन् पुढची दहा वर्षे सत्तेची स्वप्नेही पाहू नका, असा टोला मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. 

नांदेडातील भक्ती लॉन्स येथे आयोजित भाजपाच्या बुथ कमिटी मेळाव्यात ते बोलत होते़ फडणवीस म्हणाले, पुलवामा येथील हल्ल्याच्या ४८ तासांच्या आत यातील आंतकवाद्यांना कंठस्रान घालण्यात आले़ सेनेला खुली छुट दिल्यानंतर काय होते हे सर्जिकल स्ट्राईकमधून जगाने पाहिले़ आता पुन्हा एकदा सेनेला मोदींनी मोकळीक दिली असून हा नवा भारत आहे़ असा संदेश जगात गेला आहे़ जगात अशाप्रकारे कुठे हल्ला झाल्यास सर्व पक्ष एकजुट दाखवित सैन्याच्या पाठीमागे उभे राहतात़ परंतु दुर्देवाने आपल्या देशात विरोधी पक्ष एकीकडे सांगत आहेत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अन् दुसरीकडे दररोज पत्रपरिषद घेवून नवेनवे आरोप करीत सुटले आहेत. हल्ल्याच्या या घटनेचेही राजकारण केले जात आहे असा आरोपही त्यांनी केला. 

यावेळी व्यासपीठावर आ़राम पाटील रातोळीकर, आ़निलय नाईक, आ़प्रताप पाटील चिखलीकर, डॉ. माधवराव किन्हाळकर, श्यामसुंदर शिंदे, धनाजीराव देशमुख, माजी खा. डी़बी़पाटील, संतुकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, राजेश पवार यांची उपस्थिती होती.

Web Title: Do not dream to come in power for the next ten years : Chief Minister Fadnavis