नात्याला आणि खाकी वर्दीला काळिमा; पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःच्या मुलीवरच केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 14:37 IST2021-07-21T14:34:47+5:302021-07-21T14:37:47+5:30
Disgrace to father-daughter relation and khaki uniform : आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नात्याला आणि खाकी वर्दीला काळिमा; पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःच्या मुलीवरच केला अत्याचार
नांदेड : तीन लग्न झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या आपल्या दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नांदेडमध्ये उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ( The police officer raped his own daughter in Nanded )
आरोपी पोलीस कर्मचारी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. पहिली बायको सोडल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले होते. परंतु तिच्याशीही न पटल्याने त्याने अन्य एका महिलेशी सूत जुळविले होते. परंतु, दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या दोन मुले आणि मुलींशी भेटण्यासाठी तो नेहमी येत होता. त्यातूनच काही दिवसांपूर्वी त्याने दारूच्या नशेत दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर या प्रकरणात पीडित चिमुकलीच्या आईने शिवाजी नगर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.