Dikshabhumi 2025: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित नांदेडहून नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:18 IST2025-09-30T12:17:31+5:302025-09-30T12:18:28+5:30
Dikshabhumi 2025: नागपूर येथे दीक्षाभूमीवर साजऱ्या होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला या भागातून जाणाऱ्या अनुयायांना या विशेष रेल्वेचा मोठा फायदा होणार

Dikshabhumi 2025: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित नांदेडहून नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार
नांदेड : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दक्षिण मध्ये रेल्वेच्यानांदेड विभागातून नांदेड ते नागपूरदरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूर येथे दीक्षाभूमीवर साजऱ्या होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला या भागातून जाणाऱ्या अनुयायांना या विशेष रेल्वेचा मोठा फायदा होणार आहे.
नांदेड रेल्वेस्थानकावरून नांदेड ते नागपूर (गाडी संख्या ०७०८५) ही विशेष गाडी १ ऑक्टोबर रोजी रात्री ८.२० वाजता सुटणार आहे. ही गाडी मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद, पिंपळकुट्टी मार्गे धावेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.२५ वाजता पोहोचेल. तर २ ऑक्टोबर रोजी नागपूर ते नांदेड ही विशेष गाडी नागपूर स्थानकावरून रात्री ११.५५ वाजता सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता नांदेडला पोहोचणार आहे.
नांदेड-नागपूर-नांदेड ही दुसरी विशेष गाडी पूर्णा-वसमत-हिंगोली-वाशीम- अकोला धावणार आहे. सदर गाडी १ ऑक्टोबर रोजी नांदेड येथून रात्री ९.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. तर नागपूर ते नांदेड ही गाडी नागपूर येथून ३ ऑक्टोबर रोजी रात्री १ वाजता सुटेल त्याच दिवशी सकाळी ११ वाजता नांदेडला पोहोचेल. या गाडीत एकूण २० डबे असणार आहेत.