शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

Deglur - Biloli by-election: नेत्यांमध्ये वर्चस्वाचे वाद पेटल्याने भाजप उमेदवाराच्या अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 1:39 PM

Deglur - Biloli by-election: या मतदारसंघात काँग्रेसने दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले आहे, तर भाजपला शिवसेनेतून ऐनवेळी उमेदवार आयात करावा लागला.

ठळक मुद्देशिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना अखेरच्या क्षणी पक्षात एन्ट्री देऊन भाजप उमेदवार बनविलेपालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, तर दुसरीकडे भाजप एकटाच लढतो आहे.

नांदेड :   जिल्ह्यातील देगलूर - बिलोली ( Deglur - Biloli by-election ) या अनुसूचित जातीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघात ३० ऑक्टोबरला पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेस ( Congress ) व भाजप ( BJP ) उमेदवारांमध्ये थेट सामना होणार आहे. परंतु भाजपमधील नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वर्चस्वाच्या वादाचा फटका ( In Deglur - Biloli by-election BJP candidate's problems increase) उमेदवाराला निवडणुकीत बसण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे.

या मतदारसंघात काँग्रेसने दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश यांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले आहे, तर भाजपला शिवसेनेतून ऐनवेळी उमेदवार आयात करावा लागला. पक्षाकडे डझनभर उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याचे भाजपकडून सांगितले गेले. मात्र, त्यानंतरही शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना अखेरच्या क्षणी पक्षात एन्ट्री देऊन उमेदवार बनविल्याने भाजपकडे असलेल्या इच्छुकांच्या यादीतील चेहरे सक्षम नसावेत, असा तर्क लावला जात आहे. एकीकडे अंतापूरकर यांच्यासाठी काँग्रेस,  सेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जोर लावून आहेत.   पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, तर दुसरीकडे भाजप एकटाच लढतो आहे. त्यातही भाजपमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे चित्र आहे.

विरोधी गटाचे वजन वाढण्याचा धोक्का....साबणे विजयी झाल्यास जिल्ह्याचे भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर तसेच बिलोलीतील भाजपच्या दुसऱ्या गटाचे प्रमुख जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांचे पक्षात वजन वाढेल, याचा अंदाज खतगावकर समर्थकांना आहे. त्यामुळे हे वजन वाढणार नाही, याची पुरेपूर काळजी खतगावकर समर्थक घेताना दिसत आहेत. आम्हाला खतगावकरांच्या आदेशाची तेवढी प्रतीक्षा आहे, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. एकूणच खतगावकरांची नाराजी भाजप उमेदवाराला नुकसानकारक ठरणार आहे.

पित्याच्या सहानुभुतीचा पुत्राला फायदा...याउलट काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्याबाबत मतदारसंघात आजही सहानुभूती कायम आहे. त्याचा फायदा निवडणुकीत त्यांचे पुत्र काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना होईल, असे मानले जात आहे. रिंगणातील इतर दहा उमेदवार नेमके कुणाला मायनस करतात व मतदार खरोखरच त्यांना किती पसंती दर्शवितात, यावर विभाजनाचे गणित अवलंबून आहे.

भास्करराव खतगावकर ठरणार निर्णायकएकूणच भाजपमधील अंतर्गत बंडाळी लक्षात घेता भास्करराव खतगावकर निर्णायक ठरणार आहेत. त्यांचा कल भाजपविरोधात अर्थात काँग्रेस उमेदवाराकडे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एवढेच नव्हे तर खतगावकर व समर्थकांनी या निवडणूक काळात घरात बसून राहण्याची भूमिका घेतली तरी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. साबणे शिवसेनेतून भाजपात गेल्याने मुळातच निष्ठावान शिवसैनिक त्यांच्यावर नाराज आहेत. हे शिवसैनिकच साबणेंना धडा शिकवतील, असे सेना नेत्यांनी जाहीररित्या सांगून जणू धडा शिकविण्याचे फर्मानच सोडल्याचे मानले जात आहे. 

भाजप प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर कॉंग्रेसच्या वाटेवर

टॅग्स :deglur-acदेगलूरNandedनांदेडBJPभाजपाcongressकाँग्रेस