आ. राठोड यांच्या अंगरक्षकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:17 AM2021-05-10T04:17:19+5:302021-05-10T04:17:19+5:30

बरबडा येथे जुगार अड्ड्यावर धाड नायगाव तालुक्यातील बरबडा येथे शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. ८ मे ...

Come on. Rathore's bodyguard beaten | आ. राठोड यांच्या अंगरक्षकाला मारहाण

आ. राठोड यांच्या अंगरक्षकाला मारहाण

googlenewsNext

बरबडा येथे जुगार अड्ड्यावर धाड

नायगाव तालुक्यातील बरबडा येथे शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. ८ मे रोजी ही कारवाई करण्यात आली. आंब्याच्या झाडाखाली घोळका करून तिर्रट नावाचा जुगार सुरू होता. पोलिसांनी या ठिकाणाहून दुचाकीसह ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणात कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

स्नान करताना शॉक लागून मृत्यू

कंधार तालुक्यातील मौजे विजयगड येथे स्नान करीत असताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ७ मे रोजी घडली. करण केरबा सोनकांबळे हा २० वर्षीय तरुण घरात स्नान करीत होता. त्यावेळी विद्युत तारेला त्याचा हात लागला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात विजय केरबा सोनकांबळे यांनी दिलेल्या माहितीवरून कंधार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Come on. Rathore's bodyguard beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.