शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

नांदेड जिल्ह्यात दोनशे अंगणवाड्यांना मिळणार हक्काची इमारत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 20:14 IST

मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या अंगणवाडी इमारत बांधकामासाठी आता मनरेगातून निधी उपलब्ध झाला असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २०० अंगणवाडी इमारतीचे बांधकाम होणार आहे़

- भारत दाढेल  

नांदेड : मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या अंगणवाडी इमारत बांधकामासाठी आता मनरेगातून निधी उपलब्ध झाला असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २०० अंगणवाडी इमारतीचे बांधकाम होणार आहे़ त्यामुळे उघड्यावर भरणार्‍या अंगणवाड्यांना आता हक्काची इमारत मिळणार आहे़ 

जिल्ह्यात बालविकास प्रकल्प विभागाकडून चालविण्यात येत असलेल्या अंगणवाड्या इमारत नसल्यामुळे  खाजगी भाडेतत्त्वावर खोलीत तसेच शाळा, समाजमंदिर, उघड्यावर झाडाखाली भरविण्यात येतात़ सध्या सुरू असलेल्या अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत़ त्यामुळे या अंगणवाड्यांची परिस्थिती वाईट आहे़ दरम्यान, अंगणवाडी केंद्राच्या बांधकामासाठी संबंधित पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेला गेलेले प्रस्ताव सादर केले होते़ परंतु ते धूळखात होते़ मागील दोन वर्षांपासून अंगणवाडी इमारतीच्या बांधकामांचा प्रश्न रखडला होता़ गतवर्षी ७५० अंगणवाड्यांच्या बांधकामांना मंजुरीही मिळाली होती़ राज्यातील १३ जिल्ह्यांत ३ हजार ६३२ अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार होते़ मात्र  राज्य शासनाने आपला वाटा उपलब्ध करून दिला नाही, त्यामुळे या अंगणवाड्यांचे बांधकाम सुरूच झाले नाही़ या अंगणवाड्यांचे बांधकाम कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता़  अंगणवाड्यांना इमारतीच नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम होत होता़ अखेर मनरेगातून हा

प्रश्न मार्गी लागला आहे़ जिल्ह्यातील २०० अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे़ मनरेगा योजनेतंर्गत ५ लाख, केंद्र शासनाकडून १ लाख २० हजार व राज्य शासनाचे ८० हजार असे मिळून ७ लाख रूपये प्रत्येक अंगणवाडी इमारतीसाठी मंजूर करण्यात आले आहेत़ शासनाच्या तरतुदीनंतर या  इमारतीच्या बांधकामाला एप्रिल, मे मध्ये सुरूवात होणार आहे़ जिल्ह्यात एकूण ३ हजार १० अंगणवाडी केंद्र आहेत़ त्यापैकी १ हजार १० अंगणवाड्यांच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे़ 

अंगणवाडीत शून्य ते सहा वयोगटातील बालकाच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया पूर्ण होतो़ याशिवाय त्यांना आहार देवून बालकांचे आरोग्य सृदृढ करण्याची मोठी जबाबदारी अंगणवाडीसेविका पार पाडत असतात़ परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेक अंगणवाड्या उघड्यावर भरविल्या जात आहेत़ स्वतंत्र इमारत नसल्याने अनेकवेळा आहारात विषबाधा, इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत़ शासनाच्या नवीन अंगणवाडी बांधकामात आता सुरज वर्गखोली, आहारासाठी कोठार, बालकांसाठी प्रसाधनगृह उपलब्ध होणार आहे़ 

तालुकानिहाय अंगणवाड्यांची संख्याजिल्ह्यातील किनवट तालुक्यात १४, मुखेड- २२, देगलूर - १९, बिलोली - १२, कंधार -१५, भोकर- ८, हदगांव- २२, नांदेड-१६, लोहा-१६, नायगांव-९, माहूर-८, उमरी-८, मुदखेड-४, हिमायतनगर-८, धर्माबाद-११ तर अर्धापूर तालुक्यांत ८ अंगणवाड्यांचे बांधकाम होणार आहे़  

टॅग्स :Schoolशाळाzpजिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीeducationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्र