महिला दिनाचे औचित्य साधून यावेळी कर्तत्वान महिलांचा सन्मान नगरसेविका कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये पोलीस निरीक्षक प्रतिभा ठाकूर, टेकाळे, निताताई जोशी, कल्पना वडगावकर, संगिता नामदेव तिडके यांचा सत्कार राजमाता जिजाबाई यांच्या जिवनावरील पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिभा ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. अभ्यास करण्यापासून मुलींनी खेळात सहभागी होऊन प्रविण्य मिळवले पाहिजे कारण त्यामुळे नोकरीत गुणांचा फायदा होते. मातांनी मुलींमध्ये जे गुण आहेत ते ओळखून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असे त्या म्हणाल्या. बालाजी पवार यांनी महिला दिनाचा इतिहास सांगून महिलांनी आणखी ताकदीने आपल्या हक्कांसाठी चळवळ चालू ठेवली पाहिजे असे सांगितले. अध्यक्षीय समारोप ज्योती कदम यांनी केला. सूत्रसंचालन मोनिका तिडके यांनी तर प्रतिभा पवार यांनी प्रास्ताविक केले. आभार विद्या पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता पवार, मिना पवार, योजना पवार, मुक्ता पवार, गजानन पवार, अपुर्वा पवार, राजेश पवार, भवानजी पवार, रामेश्वर पवार आदींनी पुढाकार घेतला.
ज्ञानगंगा फाउंडेशनच्या वतीने कर्तृत्वान महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:32 IST