बांधकाम व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून १३ लाखांची बॅग पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 17:15 IST2020-08-21T17:12:37+5:302020-08-21T17:15:59+5:30

गाडीतील रोख रक्कम असलेली बॅग घेवून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.

A bag worth Rs 13 lakh was snatched by throwing chilli powder in the builder's eye | बांधकाम व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून १३ लाखांची बॅग पळविली

बांधकाम व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून १३ लाखांची बॅग पळविली

ठळक मुद्देचार चाकी वाहनातून उतरताच दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी डोळ्यात मिरचीची पूड टाकली.

नांदेड : शहरातील अष्टविनायकनगर येथे एका बांधकाम व्यावसायिकाची रोख १३ लाख रुपये असलेली बॅग चोरट्यांनी डोळ्यात मिरची पूड टाकून लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली.

अष्टविनायकनगर येथील बांधकाम व्यावसायिक राजू मोरे हे गुरुवारी शहरातील मुद्रांक कार्यालयातून काही संपतीची विक्री, नोंदणी करुन ते घरी जात होते. घराजवळ आल्यानंतर चार चाकी वाहनातून ते उतरताच दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली.

गाडीतील रोख रक्कम असलेली बॅग घेवून चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. या प्रकरणी भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलीस तपास करीत असून अष्टविनायकनगर परिसरात घटनास्थळी सीसीटीव्ही नसल्याची बाबही पुढे आली आहे.

Web Title: A bag worth Rs 13 lakh was snatched by throwing chilli powder in the builder's eye