शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
3
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
4
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
5
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
6
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
7
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
8
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
9
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
10
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
12
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
13
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
14
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
15
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
16
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
17
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
18
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले...
20
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

नांदेडमध्ये जाहिरात, होर्डिंग्जसाठी आता अधिकचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:07 AM

महानगरपालिकेने विनापरवाना होर्डिंग्ज, बॅनर लावण्यावर बंदी घातली आहे. परिणामी शहराचे विद्रूपीकरण करणे कमी झाले आहे. आता खाजगी जागा तसेच इमारतीवर कायमस्वरूपी लावण्यात येणाऱ्या जाहिराती तसेच होर्डिंग्जही मनपाच्या रडारवर आल्या असून गुरुवारी होणा-या मनपाच्या सर्वसाधारण सभेत या होर्डिंग्जच्या कर दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमनपाची आज सर्वसाधारण सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महानगरपालिकेने विनापरवाना होर्डिंग्ज, बॅनर लावण्यावर बंदी घातली आहे. परिणामी शहराचे विद्रूपीकरण करणे कमी झाले आहे. आता खाजगी जागा तसेच इमारतीवर कायमस्वरूपी लावण्यात येणाऱ्या जाहिराती तसेच होर्डिंग्जही मनपाच्या रडारवर आल्या असून गुरुवारी होणा-या मनपाच्या सर्वसाधारण सभेत या होर्डिंग्जच्या कर दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मुख्य प्रशासकीय इमारतीतील चौथ्या मजल्यावर असलेल्या कै. शंकरराव चव्हाण सभागृहात होत आहे. या सभेत मनपा मालकीच्या जागेवरील तसेच खाजगी जागेवर, इमारतीवर कायमस्वरूपी लावण्यात येणा-या जाहिराती तसेच होर्डिंग्ज करात दरवाढ करण्याचा प्रस्ताव आहे. याबरोबरच या सभेत तरोडा भागातील अंतर्गत मलनि:सारण योजनेच्या वाढीव कामास मान्यता देण्याचा प्रस्ताव आहे. मनपा हद्दीतील एएमआरसीअंतर्गत कामे कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही काही कंत्राटदार सुरू करण्यास असमर्थता व्यक्त करीत आहेत. सदर कामे त्यांना मंजूर केलेल्या दराने इतर नोंदणीकृत कंत्राटदारांकडून करण्यास मंजुरी देण्याबाबतचा प्रस्तावही या सभेत येणार आहे. याबरोबरच मनपा हद्दीतील मालमत्ता कराबाबत फेर सर्वेक्षण व फेरमूल्यांकन सुरू आहे. या विषयावर चर्चा अपेक्षित असून बापूराव गजभारे हे आ. प्रा. जोगेंद्र कवाडे यांना अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने मानपत्र देवून गौरविण्याचा ठराव मांडणार आहेत. तर बेबीताई गुपिले यांनी प्रभाग क्र. १९, २० संभाजी चौक ते कोचिंग क्लासेसपर्यंतच्या मजबुतीकरण व दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्र. २० मधील अनेक कामांसह इतर अंतर्गत २१ कामांचा समावेश असलेली कामे मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला आहे. या विषयालाही मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाAdvertisingजाहिरात