शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

युग हत्याकांडातील आरोपीचा अर्ज फेटाळला

By admin | Updated: April 28, 2016 03:06 IST

तपास अधिकारी (आयओ) सत्यनारायण जयस्वाल यांचे अतिरिक्त बयान नोंदविण्यासाठी युग चांडक हत्याकांड प्रकरण सत्र न्यायालयाकडे परत पाठविण्यात यावे,

हायकोर्ट : ‘आयओ’चे बयान नोंदविण्याची होती विनंतीनागपूर : तपास अधिकारी (आयओ) सत्यनारायण जयस्वाल यांचे अतिरिक्त बयान नोंदविण्यासाठी युग चांडक हत्याकांड प्रकरण सत्र न्यायालयाकडे परत पाठविण्यात यावे, अशा विनंतीसह आरोपी राजेश धनालाल दवारेचे वकील मीर नगमान अली यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज सादर केला होता. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी विविध बाबी लक्षात घेता हा अर्ज खारीज केला.सत्र न्यायालयात नोव्हेंबर-२०१५ मध्ये जयस्वाल यांचे बयान नोंदविण्यात आले होते. त्यावेळी तपासातील काही अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्यांवर त्यांची उलटतपासणी घेण्यात आली नाही. खटल्यात पारदर्शीपणा असणे आरोपीचा अधिकार आहे. यामुळे जयस्वाल यांचे अतिरिक्त बयान नोंदविण्यासाठी हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे परत पाठविण्यात यावे, असे अर्जात नमूद करण्यात आले होते. अरविंद अभिलाष सिंग (२४) हा प्रकरणातील दुसरा आरोपी आहे. राजेश कळमन्यातील वांजरी ले-आऊट, तर अरविंद जरीपटक्यातील प्रीती ले-आऊट येथील रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०१६ रोजी दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३६४ -अ (खंडणीसाठी अपहरण)अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३०२ (हत्या)अंतर्गत मरेपर्यंत फाशी व कलम २०१ (पुरावे नष्ट करणे)अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी हे प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३६६ अनुसार उच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे. तसेच दोन्ही आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले आहे. ही घटना १ सप्टेंबर २०१४ रोजी घडली होती.(प्रतिनिधी)सरकारी वकिलाचा युक्तिवाद पूर्णमुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांचा युक्तिवाद बुधवारी पूर्ण झाला. परिस्थितीजन्य पुरावे, ५० साक्षीदारांचे बयान, शवविच्छेदन व डीएनए अहवाल आणि सीडीआर यावरून आरोपींनी खंडणीसाठी युगचे अहपहरण करून त्याची हत्या केली हे सिद्ध होते, असे डांगरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांना फिर्यादीच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी सहकार्य केले. गुरुवारपासून आरोपीचे वकील युक्तिवाद करतील.