शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

नागपुरात तरुणांचे सोशल मीडियावर ‘अजनी बचावो’ कॅम्पेन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 7:00 AM

Nagpur News अजनी इंटर मॉडेल स्टेशनसाठी रेल्वे कॉलनी परिसरातील हजारो वृक्षतोडीचा मुद्दा आता पेट घ्यायला लागला आहे. हजारोच्या संख्येने झाडांची कत्तल होऊ नये म्हणून आता जागरूक तरुणाईने सोशल मीडियावर जनजागृती कॅम्पेन सुरू केले आहे.

ठळक मुद्दे‘आरे’ स्टाईल आंदोलन स्वाक्षरी अभियानही राबविणार

निशांत वानखेडे

नागपूर : अजनी इंटर मॉडेल स्टेशनसाठी रेल्वे कॉलनी परिसरातील हजारो वृक्षतोडीचा मुद्दा आता पेट घ्यायला लागला आहे. हजारोच्या संख्येने झाडांची कत्तल होऊ नये म्हणून आता जागरूक तरुणाईने सोशल मीडियावर जनजागृती कॅम्पेन सुरू केले आहे. मुंबईत ‘आरे वन’ वाचविण्यासाठी झालेल्या आंदोलनाच्या धर्तीवर ‘अजनी वाचवा’ अभियान उभे करण्याचा निर्धार या तरुणांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

या तरुणांनी नुकतेच लोकांमध्ये जागृती करण्यासाठी अजनी रेल्वे परिसरात बॅनर लावून मूक प्रदर्शन केले. अजनी कॉलनी परिसरात आज जी घनदाट हिरवळ दिसते, पुढे ती दिसणार नाही, हा मुद्दा एका एका व्यक्तीला गुगल मॅपद्वारे समजाविला जात आहे. मॉडेल स्टेशनसाठी ७००० हजार झाडे कापली जाणार आहेत. नागपूरचे पर्यावरण संकटात येणार आहे. ते वाचविण्यासाठी आपणच जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांनी फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आदी सोशल मीडियावर कॅम्पेन चालविले आहे. याशिवाय या परिसरात स्वाक्षरी अभियानही राबवू, एकाएका व्यक्तीकडे जाऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

नागपूरची दिल्ली करता का

जगात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून दिल्लीची गणना हाेते. याबाबत नागपूर बऱ्यापैकी सुरक्षित आहे कारण शहरात थाेड्या प्रमाणात का हाेइना हिरवळ शिल्लक आहे. मात्र विकासाच्या नावावर तीही नष्ट करण्याच प्रयत्न केला जात आहे. एनएचएआय २००० झाडे कापणार असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात ७००० वर झाडे कापली जाणार आहेत. विचार करा, प्रदूषणाचा स्तर किती वाढेल. यांना नागपूरला दिल्ली बनवायचे आहे, असे वाटते.

- कुणाल माैर्य

एका एका व्यक्तीकडे जाऊ

आम्ही स्वाक्षरी अभियान राबविणार आहाेत. एकएक व्यक्तीकडे जाणार. गुगल मॅपद्वारे समजावून सांगणार. झाडे गेली तर शुद्ध हवा मिळणार नाही, हे पटवून देणार.

- साहिल रबडे

ग्रीन सिटीची ओळख पुसेल

अजनी परिसराप्रमाणे शहरात असलेल्या थोड्याफार वनसंपदेमुळे ग्रीन सिटी म्हणून नागपूरची ओळख आहे. विकास कामांसाठी ही वनराई कापली जात आहे. यामुळे ग्रीन सिटी म्हणून असलेली नागपूरची ओळख इतिहासजमा होइल.

- पंकज जुनघरे

हे चालले काय

कुठलेही काम असले की झाडे कापली जातात. अजनी रेल्वे परिसरातच वंजारीनगर पाण्याची टाकी ते रेल्वे मेन्स शाळा या पुलाचे काम, लाेकाेमाेटिव्ह कंपनीचे काम व अजनी रेल्वे काॅलनी पुनर्वसनासाठी ५०० हून अधिक झाडे कापली आहेत. आता या प्रकल्पासाठी हजाराे झाडे कापली जातील. जराही विचार केला जात नाही. हे चालले तरी काय

- राेहन अरसपुरे

लाेकमतची भूमिका भविष्याची

लाेकमतच्या बातम्यांमुळे आम्हाला हा पर्यावरण संकटाचा प्रकार कळला. भविष्याच्या दृष्टीने लाेकमत चांगले काम करीत आहे. याद्वारे आम्ही साेशल मीडियावर जनजागृती करीत आहाेत. गुगल मॅपद्वारे समजावित आहाेत. हे अभियान माेठे करू.

- अंकित बन्साेड

एकही झाड कापू देणार नाही

७००० झाडे म्हणजे एक जंगलच हाेय. हे नागपूरचे वैभव आहे. यामुळे नागपूरचे पर्यावरण टिकून आहे आणि पुढच्या काळासाठी ते टिकून राहणे गरजेचे आहे. आम्ही एकही झाड कापू देणार नाही.

- राेशन सगने

टॅग्स :Metroमेट्रो