शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनो नियमित रक्तदान करा  : भूषणकुमार उपाध्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 23:37 IST

अनेक लोक भ्रामक कल्पनेतून रक्तदान करीत नाही, हे विचार बदलणे आवश्यक आहे. युवकांनी नियमित रक्तदान करण्याची गरज आहे. कमीत कमी वर्षातून दोनदा तरी रक्तदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे केले.

ठळक मुद्दे हेडगेवार रक्तपेढीत रक्तघटक विघटन यंत्राचे लोकार्पण

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक लोक भ्रामक कल्पनेतून रक्तदान करीत नाही, हे विचार बदलणे आवश्यक आहे. युवकांनी नियमित रक्तदान करण्याची गरज आहे. कमीत कमी वर्षातून दोनदा तरी रक्तदान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी येथे केले.

डॉ. हेडगेवार रक्तपेढीत अत्याधुनिक रक्तघटक विघटन यंत्राचे लोकार्पणप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर उद्योगपती अजय कनोरिया, डॉ. दिलीप गुप्ता, डॉ. पी.के. देशपांडे, डॉ. अनसिंगकर, डॉ. हर्षा सोनी, नगरसेविका परिणिता फुके, रवी वाघमारे, बाळासाहेब वेलनकर व रक्तपेढीचे सचिव अशोक पत्की उपस्थित होते.पोलीस विभागाकडूनही जास्तीत जास्त रक्तदान होण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही डॉ. उपाध्याय यांनी दिली. पत्की म्हणाले, डॉ. हेडगेवार रक्तपेढी रुग्णांना सुरक्षित रक्तपुरवठा कसा करता येईल, यासाठी नेहमीच जागरूक असते. नुकतेच रक्तपेढीने ‘प्लेटलेट क्रॉस मॅच’ हे तंत्रज्ञान आणले. मध्य भारतात ही सोय केवळ याच रक्तपेढीत उपलब्ध आहे. यात आता ‘रक्त विघटन’ यंत्राची भर पडल्याने याचा फायदा रुग्णांना होणार आहे. यासाठी कनोरिया यांनी आर्थिक मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.उपस्थितांचा परिचय प्रकाश कुंडले यांनी करून दिला. संचालन प्रवीण पाटील यांनी केले तर आभार हरीभाऊ इंगोले यांनी मानले.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीpolice commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय