प्रेयसीवर अत्याचार करून बनविला व्हिडिओ; व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 15:34 IST2022-10-17T15:26:44+5:302022-10-17T15:34:36+5:30
आरोपीला अटक

प्रेयसीवर अत्याचार करून बनविला व्हिडिओ; व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शोषण
नागपूर : प्रेयसीवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ तयार केल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार हॉटेलमध्ये बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध करणाऱ्या आरोपीला धंतोली पोलिसांनी अटक केली आहे.
प्रणय संजय वहाणे (२० लाखनी,सोमलवाडा रोड) असे आरोपीचे नाव आहे. वाडी येथील रहिवासी १९ वर्षाच्या पीडितेशी आरोपी प्रणयची २०१६ मध्ये ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु काही वर्षानंतर युवतीने प्रणयशी बोलणे बंद केले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रणयने नागपूरला येऊन युवतीला मारहाण करून जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याचा त्याने व्हिडिओ तयार केला.
दरम्यान पीडित अल्पवयीन होती. त्यानंतर आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन धंतोलीतील लॉजमध्ये बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला. काही दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेला व्हिडिओ पाठवून २ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर पीडितेने धंतोली ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली. धंतोलीचे हवालदार कृष्णा यांनी आरोपीविरुद्ध बलात्कार,धमकी देणे,मारहाण आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला.