लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली पोलिसांत भरतीचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करून पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. स्वप्निल टेंभेरे (३४, रा. सालेकसा, गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.
स्वप्निल पोलिस भरतीत सहभागी होणाऱ्यांना प्रशिक्षण देतो. २४ वर्षीय पीडिता पोलिसांत भरती होण्याची तयारी करत होती. ती २०२३ च्या पोलिस भरतीसाठी सराव करण्यासाठी मानकापूर स्टेडियममध्ये जात असे. स्वप्निल तिथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असे. यादरम्यान तरुणी त्याला भेटली आणि स्वप्निलकडून प्रशिक्षण घेतले. या दरम्यान, स्वप्निलने दिल्ली पोलिसांशी संबंध असल्याचे भासवून तरुणी आणि तिच्या वडिलांना विश्वासात घेतले. त्याने दिल्लीतील एका प्रभावशाली व्यक्तीशी संबंध असल्याचा दावा केला आणि त्याच्यामार्फत तिला नोकरी मिलतन देण्याचे आश्वासन दिले त्याने तिला कागदपत्रांसह दिल्लीला सोबत येण्यास सांगितले. त्याने नोकरीच्या नावाखाली तिच्याकडून पाच लाख रुपये घेतले. तिला दिल्लीला घेऊन गेल्यानंतर लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
त्याने त्यावेळी फोटो काढले व ते व्हायरल करण्याची धमकी देत तो तिच्यावर अत्याचार करू लागला. हा प्रकार आठ महिने सुरू होता. तिने त्याला नोकरीबद्दल विचारले असता स्वप्निलने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिला संशय आला. तिने त्याला पैसे परत मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिला. दरम्यान, तो विवाहित असल्याचेदेखील तिला कळले. तिने कोराडी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी स्वप्निलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे
Web Summary : A Nagpur woman was exploited for eight months under the pretense of marriage and a Delhi police job. The accused, a police training instructor, took ₹5 lakhs from her, promising a job and then blackmailing her. He was later arrested.
Web Summary : नागपुर में एक महिला का विवाह और दिल्ली पुलिस में नौकरी के बहाने आठ महीने तक शोषण किया गया। आरोपी, एक पुलिस प्रशिक्षण प्रशिक्षक, ने नौकरी का वादा करके उससे ₹5 लाख लिए और फिर उसे ब्लैकमेल किया। बाद में उसे गिरफ्तार कर लिया गया।