लग्नाचे आमिष दाखवत ‘फेसबुक फ्रेंड’कडून तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2022 15:49 IST2022-07-28T15:37:45+5:302022-07-28T15:49:38+5:30

त्याने तिला लग्न करण्याचे आश्वासन देत जाळ्यात ओढले.

young woman Sexually Abused by 'Facebook friend' showing lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवत ‘फेसबुक फ्रेंड’कडून तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवत ‘फेसबुक फ्रेंड’कडून तरुणीवर अत्याचार, गुन्हा दाखल

नागपूर : ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एका ‘फेसबुक फ्रेंड’ने लग्नाचे आमिष दाखवत महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केले. संबंधित विद्यार्थिनी गरोदर राहिल्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला. तिच्या तक्रारीवरून आरोपी हेमंत मनोहर मेश्राम (२९, रा. शुभम कॉलनी, यवतमाळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत मेश्राम एमपीएससीची तयारी करत आहे. पीडित विद्यार्थिनी ही चंद्रपूर येथील रहिवासी आहे. एप्रिल महिन्यात फेसबुकवर तिची हेमंतसोबत ओळख झाली होती. हेमंतने तिला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवली होती. त्यानंतर दोघांमध्ये ‘व्हॉट्सॲप’वर बोलणे सुरू झाले. पुढे नियमित फोनवरही बोलणे सुरू झाले. त्याने तिला लग्न करण्याचे आश्वासन दिले.

नागपुरात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला भेटण्यासाठी हेमंत नागपुरात येऊ लागला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या परिसरात त्याचा मित्र राहतो. हेमंत विद्यार्थिनीला भेटण्यासाठी कॉलेजमध्ये येत असे. तासभर बोलायचे आहे, असे सांगून त्याने तिला मित्राच्या खोलीत आणले आणि तेथे बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.

हेमंतने नागपुरात येऊन विद्यार्थिनीशी दोनदा संबंध प्रस्थापित केले. यामुळे मुलगी गरोदर राहिली. हेमंतने तिला गर्भनिरोधक गोळ्या दिल्या आणि सेवन करण्यास सांगितले. विद्यार्थिनीने त्यासाठी नकार दिला. तिने हेमंतवर लग्नासाठी दबाव टाकला. हेमंतने नकार दिल्याने तिने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी हेमंतवर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: young woman Sexually Abused by 'Facebook friend' showing lure of marriage