दुचाकी अपघातात तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:08 IST2021-05-16T04:08:43+5:302021-05-16T04:08:43+5:30

कामठी : अनियंत्रित दुचाकी मंदिराच्या भिंतीवर आदळली. त्यात गंभीर जखमी झालेल्या विवाहित तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कामठी ...

Young woman dies in two-wheeler accident | दुचाकी अपघातात तरुणीचा मृत्यू

दुचाकी अपघातात तरुणीचा मृत्यू

कामठी : अनियंत्रित दुचाकी मंदिराच्या भिंतीवर आदळली. त्यात गंभीर जखमी झालेल्या विवाहित तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कामठी शहरात गुरुवारी (दि. १३) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

रोहिणी अक्षय गेडाम (२२, रा. रनाळा, ता. कामठी), असे मृत तरुणीचे नाव आहे. तिचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले हाेते. ती पती अक्षयसाेबत एमएच-४०/सीबी-६०९० क्रमांकाच्या ज्युपिटरने कामठी शहरातील कामठी (जुनी) पाेलीस ठाण्याजवळील स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी गेली हाेती. अक्षयने ज्युपिटर उभी केली. चावी न काढता ताे दुकानात गेला आणि राेहिणी त्या दुचाकीवर बसून हाेती. त्यातच तिने ज्युपिटर सुरू करून ॲक्सिलेटर वाढविल्याने दुचाकी समाेर असलेल्या मंदिराच्या भिंतीवर धडकली. यात तिच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कामठी पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Young woman dies in two-wheeler accident