शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मांजाने गळा कापल्याने रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 7:07 PM

Death : आज सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास इमामवाडा पोलिसांच्या हद्दीतील जाटतरोडी भागात ही घटना घडली.

ठळक मुद्देप्रणव प्रकाश ठाकरे असे मृतकाचे नाव आहे.पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याचा करुण अंत - इमामवाड्यात घडली घटना

नागपूर - प्रणय प्रकाश ठाकरे (वय २१) हा युवक त्याच्या वडिलांसह बहिणीच्या अॅडमिशनसाठी गेला होता. तिकडले काम आटोपल्यानंतर प्रकाश ठाकरे यांनी प्रणयला तू पुढे चल, मी येतो मागून म्हणून घराकडे पाठविले. काही वेळेनंतर प्रकाश ठाकरे जाटतरोडी पोलीस चौकीजवळून जात असताना त्यांना तेथे गर्दी दिसली. प्रकाश तेथून घरी गेले. घरी गेल्यानंतर प्रणय अद्याप घरी पोहचलाच नाही, हे त्यांना कळले अन् काही वेळेतच पोलिसांनी त्यांच्या काळजाला चिरणारी बातमी सांगितली. मांजाने गळा कापला गेल्याने प्रणयचा मृत्यू झाल्याचे कळाल्याने ते सून्नच पडले. नायलॉन मांजा विक्री आणि वापरावर शासनाने बंदी घातली आहे. घातक मांजा विकू नका, साठवू नका आणि वापरूही नका, असे आवाहन करून पोलिसांनी कारवाईचा ईशारा दिला आहे. अनेक मांजा विक्रेत्यांवर कारवाईदेखिल केली जात आहे. मात्र, पैश्यासाठी दुसऱ्याच्या जीवावर उठलेले समाजकंटक मांजाची विक्री करत आहेत अन् वापरतही आहेत. त्यांच्यामुळेच मंगळवारी सायंकाळी ५.१५ ते ५.३० च्या सुमारास ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली अन् कोणताही दोष नसताना प्रणय प्रकाश ठाकरे या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला.

अजनीतील ज्ञानेश्वरीनगरात राहणारा प्रणय पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता. तो त्याचे वडील, बहिण श्रुती आणि मोठे वडील रमेश ठाकरे हे चाैघे मंगळवारी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात डोमिसाईल बनविण्यासाठी गेले होते. तेथून ते दाभ्याच्या एका नर्सिंग कॉलेजमध्ये गेले. तेथे श्रुतीच्या अॅडमिशनची प्रक्रिया आटोपल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास प्रकाश ठाकरे यांनी प्रणय तसेच मोठे भाऊ रमेश यांना घराकडे जायला सांगितले. त्यानुसार, रमेश ठाकरे त्यांच्या मोटरसायकलने तर प्रणय अॅक्टीव्हाने निघाले. संविधान चौकाजवळून रमेश ठाकरे रेल्वेस्थानकाकडे निघाले तर प्रणय त्याच्या अॅक्टीव्हाने घराकडे निघाला. सरदार पटेल चौकातून जाटतरोडी मार्गे तो घरी जात होता. पोलीस चाैकीजवळ अचानक त्याला गळा कापला जात असल्याचे लक्षात आले. त्याने जीव वाचविण्यासाठी दोन्ही हाताने मांजा पकडला. त्यात दुचाकी सुटून तो खाली पडला. गळा खोलवर कापला गेला अन् हातही कापले गेले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रणय गंभीर अवस्थेत रस्त्यावर आचके देऊ लागला. आजुबाजुच्यांनी धाव घेऊन प्रणयला तातडीने पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात पाठविले. माहिती कळताच ठाणेदार मुकूंद सोळंके आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे पोहचले. मेडिकलमध्ये डॉक्टरांनी प्रणयला मृत घोषित केले. 

बहिणीला मोबाईल दिला अन्...

प्रणयने घराकडे निघताना त्याच्याजवळचा मोबाईल बहिणीला दिला होता. त्यामुळे त्याचा अपघात झाल्यानंतर त्याच्या घरच्यांना संपर्क करणेही शक्य झाले नाही. दुचाकीच्या कागदपत्रावरून त्याच्या घराचा पत्ता शोधत पोलीस घरी पोहचले. त्यावेळी श्रुतीची नर्सिंगला अॅडमिशन झाल्याच्या आनंदात त्याचे कुटुंबीय होते. काही वेळेपूर्वीच प्रकाश ठाकरे ज्या ठिकाणी प्रणयचा घात झाला तेथून परतले होते. गर्दीतून त्यांनी कोण पडून आहे, हे जाणून घेण्याऐवजी घर गाठले अन् नंतर पोलिसांनी त्यांना जी माहिती दिली ती त्यांचे काळीज चिरणारी ठरली. 

पतंगबाजाविरुद्ध कुटुंबीयांचा आक्रोशप्रणयचे वडील प्रकाश ठाकरे ईलेक्ट्रीशियन आहेत. त्याच्या आईचे लहानपणीच निधन झाले. त्याला श्रुती नामक लहान बहिण आहे. तर, प्रकाश यांना रमेश, पोलीस हवलदार अनिल ठाकरे तसेच एक डॉक्टर असे तीन चुलतभाऊ आहेत. ते सर्व एकाच ईमारतीत राहतात. प्रणयच्या अशा अकाली मृत्यूने ठाकरे कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. मांजा विक्रेते अन् पतंगबाजांविरुद्धही त्यांनी एकच आक्रोश केला आहे. अशा प्रकारे निर्दोष व्यक्तींचे बळी घेणारे मांजा विक्रेते तसेच पतंगबाजावर हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रणयचे मोठे वडील रमेश ठाकरे यांनी लोकमतजवळ नोंदवली.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर