व्हॉट्सॲपवर ‘गुड बाय’ असे स्टेटस ठेवून युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2022 22:28 IST2022-06-17T22:27:44+5:302022-06-17T22:28:14+5:30
Nagpur News व्हॉट्सअपवर ‘गुड बाय’ असे स्टेटस ठेवून एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाठोडा ठाण्यांतर्गत घडली आहे.

व्हॉट्सॲपवर ‘गुड बाय’ असे स्टेटस ठेवून युवकाची आत्महत्या
नागपूर : व्हॉट्सअपवर ‘गुड बाय’ असे स्टेटस ठेवून एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाठोडा ठाण्यांतर्गत घडली आहे. सुनील ऊर्फ निखिलेश राजू माळी (२७, अंतुजीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे.
सुनील मजुरी करीत होता. तो एकटाच राहत होता. काही अंतरावर त्याची आई राहत होती. सुनीलला दारूचे व्यसन होते. सुनीलच्या आईने दुसरे लग्न केल्याचे सांगण्यात येत आहे. सुनील कर्जबाजारी होता. दारू आणि कर्जामुळे तो निराशेत जीवन जगत होता.
त्याने व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवून गुरुवारी सकाळी गळफास घेतला. सुनीलचे व्हॉट्सॲप स्टेटस पाहून त्याच्या मित्रांना शंका आली. त्यांनी सुनीलच्या आईला सांगितले. त्याची आई सकाळी १०.३० वाजता त्याच्या खोलीत आली असता तिला सुनील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
.............