क्षुल्लक कारणावरून तरुणास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:09 IST2021-04-02T04:09:39+5:302021-04-02T04:09:39+5:30

माैदा : क्षुल्लक कारणावरून दाेघांनी तरुणास मारहाण करीत जखमी केले. ही घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तुमान ...

Young man beaten for trivial reasons | क्षुल्लक कारणावरून तरुणास मारहाण

क्षुल्लक कारणावरून तरुणास मारहाण

माैदा : क्षुल्लक कारणावरून दाेघांनी तरुणास मारहाण करीत जखमी केले. ही घटना अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तुमान येथे बुधवारी (दि. ३१) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

मिथुन राजकुमार चाैरे (३०, रा. बागडीपार शांतिनगर, नागपूर) असे जखमी तरुणाचे नाव असून, सरताज ताराचंद रंधई (२४) व विजय चंद्रभान वानखेडे दाेघेही रा. तुमान, ता. माैदा, अशी आराेपींची नावे आहेत. आराेपींनी मिथुन चाैरे याला रस्त्यात थांबवून ‘तू मला शिवीगाळ का केली’ असे म्हणून त्याला हातबुक्कीने व दगडाने मारहाण करीत जखमी केले. त्यानंतर आराेपींनी तेथून पळ काढला. याप्रकरणी अराेली पाेलिसांनी भादंवि कलम ३४१, ३२४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार भगवान चांदेवार करीत आहेत.

Web Title: Young man beaten for trivial reasons