शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

चाकू हल्ल्यात तरुण जखमी

By admin | Updated: February 15, 2017 03:17 IST

जुन्या वैमनस्यातून दोघांनी तरुणावर चाकू हल्ला केला. त्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, हल्ला करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली.

दोघांना अटक : कामठीच्या कुंभारे कॉलनीतील घटना कामठी : जुन्या वैमनस्यातून दोघांनी तरुणावर चाकू हल्ला केला. त्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, हल्ला करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ही घटना कामठी शहरातील कुंभारे कॉलनीत रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. इरफान शेख (२४, रा. कुंभारे कॉलनी, कामठी) असे जखमी तरुणाचे नाव असून, अश्वजित मेश्राम व अरविंद हिरेखण दोघेही रा. कामठी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अश्वजित व अरविंदचा इरफान शेख याच्यासोबत वाद होता. त्यामुळे दोघेही वचपा घेण्याच्याच विचारात होते. दरम्यान, रविवारी रात्री इरफान या दोघांना कुंभारे कॉलनीत भेटला. त्यांनी इरफानसोबत भांडायला सुरुवात केली. वाद विकोपास जाताच दोघांनीही इरफानच्या पोटावर चाकूने वार करायला सुरुवात केली. यात गंभीर जखमी झाल्याने इरफान खाली कोसळला. दोघांनीही घटनास्थळाहून पळ काढला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी इरफानला लगेच कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. या प्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी इरफान शेख याच्या तक्रारीवरून भादंवि ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आणि दोन्ही आरोपींना लगेच अटक केली. (तालुका प्रतिनिधी)