तू सोला बरस की, वो सतरा बरस का...! प्रेमासाठी वाट्टेल ते; बॉयफ्रेण्डला बनविले मावसभाऊ

By नरेश डोंगरे | Updated: March 10, 2026 20:23 IST2026-03-10T20:20:48+5:302026-03-10T20:23:40+5:30

Nagpur : फेसबूक अन् नंतर इन्स्टावर फुललेल्या प्रेमाने ते मानसिकरित्या जवळ आले. त्यानंतर 'चल कही दूर निकल जाये' असा त्यांनी निर्णय घेतला. मात्र, नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी त्यांना ताब्यात घेतले.

You are sixteen years old, he is seventeen...! Everything for love; she made her boyfriend her cousin | तू सोला बरस की, वो सतरा बरस का...! प्रेमासाठी वाट्टेल ते; बॉयफ्रेण्डला बनविले मावसभाऊ

You are sixteen years old, he is seventeen...! Everything for love; she made her boyfriend her cousin

नरेश डोंगरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
फेसबूक अन् नंतर इन्स्टावर फुललेल्या प्रेमाने ते मानसिकरित्या जवळ आले. त्यानंतर 'चल कही दूर निकल जाये' असा त्यांनी निर्णय घेतला. मात्र, नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी त्यांना ताब्यात घेतले. अल्पवयीन असूनही मुलींची धिटाई बघण्यासारखी होती. तिने तिच्या बॉयफ्रेण्डला चक्क 'मावशीचा मुलगा' आहे, असे सांगून पोलिसांच्या चाैकशीचा ससेमिरा टाळण्याचे प्रयत्न केले. मात्र, नंतर चाैकशीत जे उघड झाले ते पोलिसांनाही चाट पाडणारे ठरले.

सोमवारी पहाटे नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर ही प्रेमकथा उजेडात आली. फूड स्टॉलजवळ एक मुलगा आणि मुलगी संशयास्पद अवस्थेत घुटमळताना आरपीएफ जवानांच्या नजरेस पडली. आरपीएफने त्यांची विचारपूस केली असता बाहेरगावी जाण्यासाठी ट्रेनची वाट बघत असल्याचे या दोघांनी सांगितले. मुलाने आपले वय १७ तर मुलीने १६ वर्षे सांगितले. हा माझ्या मावशीचा मुलगा असून आम्ही छिंदवाड्याला राहतो, अशीही माहिती दिली. आमची विनाकारण चाैकशी का करता, असा मुलीचा प्रश्न होता. संशय आल्याने आरपीएफचे पीएसआय व्ही. पी. सिंग यांनी मुलीच्या आईवडिलाचा संपर्क नंबर घेतला आणि त्यांना पहाटे ३ च्या सुमारास फोन करून तुम्ही कुठे राहता आणि सध्या तुमची मुलगी कुठे आहे, अशी विचारणा केली.

पालकांनी आपण शिवनी (मध्य प्रदेश) मध्य राहतो आणि मुलगी छिंदवाड्याला शिकते, ती सध्या तेथेच आहे. एक दिवसापूर्वीच आमचे बोलणे झाले, अशी माहिती दिली. मुलगी नागपूर स्थानकावर असून तीच्या सोबत तिचा मावसभाऊ असल्याचे सिंग यांनी पालकांना सांगितले. ते ऐकून पालकही चक्रावले. तिला मावशी नाही अन् त्यामुळे ती मावसभावासोबत असण्याचा प्रश्नच नसल्याचे मुलीच्या आईने ठणकावून सांगितले. पुढे या दोघांच्या प्रेमकथेचा आणि बाहेर पळून जाण्याच्या घटनाक्रमाचा उलगडा झाला. मुलगा-मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरपीएफने चाईल्ड लाईनचे सांगोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बोलवून घेत या दोघांना त्यांच्या ताब्यात दिले. चाईल्ड लाईन प्रतिनिधींनी वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुधारगृहात पाठविले.

त्यांचीही प्रेमकहानी अशीच !

या घटनेच्या काही वेळेनंतर पुन्हा असेच एक प्रेमीयुगूल आरपीएफच्या नजरेस पडले. चाैकशीत मुलगी नागपूरची तर मुलगा पुण्याचा असल्याचे उघड झाले. त्यांचीही प्रेम कहानी फेसबूकवरूनच पुढे सरकली. एकमेकांच्या विरहाने व्याकुळ झालेल्या या दोघांनी 'चल कही दूर निकल जाये'चा निर्णय घेतला. त्यानुसार, तो पुण्याहून नागपूरला पोहचला. ती देखिल रेल्वे स्थानकावर पोहचली. मात्र, आरपीएफच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेऊन प्राथमिक चाैकशीनंतर त्यांना चाईल्ड लाईनच्या माध्यमातून बालसुधार गृहात पाठविले.

ती पोहचली, तो आलाच नाही !

सोमवारी पहाटे रेल्वे स्थानकावरच उघडकीस आलेली तिसरी प्रेमकथा प्रेयसीचा अपेक्षाभंग करणारी आहे. प्रियकराने केलेल्या प्रॉमिसनुसार अल्पवयीन मुलगी रेल्वे स्थानकावर पोहचली. रात्रीपासून पहाटेपर्यंत ती आपल्या प्रियकराची डोळ्यात जीव आणून प्रतिक्षा करीत होती. मात्र, तो आलाच नाही. परिणामी तिची अवस्था सैरभैर झाली. तिचे अस्वस्थ वर्तन लक्षात आल्याने आरपीएफच्या महिला आरक्षक शिरीन हुसेन आणि चाइल्डलाईन प्रतिनिधींनी तिला विश्वासात घेत तिची विचारपूस केली. त्यानंतर तिला पालकांच्या ताब्यात देण्याचे प्रयत्न सुरू केले.

Web Title : नागपुर रेलवे स्टेशन पर किशोर प्रेम कहानियाँ: एक सारांश

Web Summary : नागपुर रेलवे स्टेशन पर तीन किशोर प्रेम कहानियाँ सामने आईं। एक लड़की ने अपने प्रेमी को चचेरा भाई बताया। एक और जोड़ा फेसबुक पर मिलने के बाद मिला। तीसरी लड़की अपने प्रेमी का इंतजार करती रही। सभी को आरपीएफ ने हिरासत में ले लिया और चाइल्डलाइन को सौंप दिया गया।

Web Title : Teenage Love Escapades Unfold at Nagpur Railway Station: A Summary

Web Summary : Three teenage love stories unfolded at Nagpur Railway Station. One girl pretended her boyfriend was her cousin. Another couple met after connecting on Facebook. A third girl was left waiting by her boyfriend. All were taken into custody by RPF and handed to Childline.