शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

यस्स ! व्ही आर द बेस्ट

By admin | Updated: February 16, 2015 02:19 IST

भारतीय संघाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सहाव्यांदा चारीमुंड्या चीत केले अन् उपराजधानीत रविवारी जल्लोषाला अक्षरश: उधाण आले.

नागपूर : भारतीय संघाने पाकिस्तानला विश्वचषकात सलग सहाव्यांदा चारीमुंड्या चीत केले अन् उपराजधानीत रविवारी जल्लोषाला अक्षरश: उधाण आले. आधीच रविवार अन् त्यात ‘हाय व्होल्टेज’ सामना असल्याने दिवसभर ज्या रस्त्यांवर शुकशुकाट होता, ते सर्व रस्ते सळसळत्या चैतन्याने वाहू लागले होते. सायंकाळच्या सुमारास शहरातील प्रत्येक भागात अक्षरश: दिवाळी साजरी झाली. यंगिस्तानचा उत्साह तर ओसंडून वाहत होता अन् धरमपेठ, सदर, वर्धमान नगर, महाल, फुटाळा या परिसरात जोरदार जल्लोष झाला. ‘कमॉन इंडिया’, ‘भारत माता की जय’, ‘चक दे इंडिया’ या घोषणांनी हे परिसर दणाणून निघाले होते. भारत-पाक सामना रविवारीच आल्याने शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी ही पर्वणीच होती. एरवी सकाळी न उठणारे महाभागदेखील सर्व आवरून ७.३० पासूनच दूरचित्रवाणी संचासमोर बसले होते. सामना सुरू होण्याच्या अगोदर शहरातील काही मंदिरात चाहत्यांकडून प्रार्थना करण्यात आली. धरमपेठेत तर विश्वचषकाच्या प्रतिकृतीची लहान मुलांनी आरतीदेखील केली. टीव्ही स्क्रीनला डोळे लावून बसलेले हजारो क्रिकेट रसिक विजयानंतर सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर उतरले. घोषणा, ढोलताशांच्या गजरात नाच-गाणी अन् जोरदार आतषबाजी यामुळे संपूर्ण शहरात उत्साह दिसून आला. महाल-इतवारी परिसरात तर फटाक्यांची जोरदार आतषबाजी झाली. शहरातील अ़नेक चौकांमध्ये मिठाई, साखर, लाडू वाटण्यात आले.विश्वचषक जिंकल्याचा अनुभव२ एप्रिल २०११ साली भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर उपराजधानीत ‘न भूतो न भविष्यति’ असे ‘सेलिब्रेशन’ झाले होते. त्यानंतर विश्वचषकातला रविवारचा पहिलाच सामना होता. पाकिस्तानवर विजय मिळवून ‘टीम इंडिया’ने विश्वचषक जिंकल्याचा आनंद दिला आहे, असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होते. त्यामुळे ‘सेलिब्रेशन’देखील तसेच ‘रॉकिंग’ होते. लक्ष्मीभुवन चौकात तर उत्साहाला अक्षरश: उधाणच आले होते. कोणी पायी, कोणी दुचाकी तर कोणी कारमधून विजयाचा आनंद साजरा केला.