शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

होय, हे सत्य आहे! फुलपाखरांच्या सौंदर्यात दडलेय विष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 07:00 IST

काही प्रजातीची फुलपाखरे ही विषारी असतात. ती कुणाला चावत नाही व त्यांच्यामुळे माणूसही दगावत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनिशांत वानखेडेनागपूर : निसर्गाने मुक्तपणे रंगांची उधळण करून अप्रतिम सुंदरतेने सजविलेली फुलपाखरे विषारी असतात काय, असा प्रश्न विचारला तर लोक नक्कीच वेड्यात काढतील. कारण फुलपाखरे विषारी असतात, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण होय, हे सत्य आहे. काही प्रजातीची फुलपाखरे ही विषारी असतात. ती कुणाला चावत नाही व त्यांच्यामुळे माणूसही दगावत नाही. मात्र अशा फुलपाखरांना एखाद्या पक्ष्याने भक्ष्य बनविले तर त्याचा जीव गेलाच म्हणून समजा. पक्ष्यांपासून बचाव करण्यासाठी शरीरात असलेले हे विष फुलपाखरासाठी मात्र वरदानच ठरते.निसर्ग व फुलपाखरू अभ्यासक आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी त्यांच्या निरीक्षणातील आश्चर्यकारक नोंदीची माहिती दिली. फुलपाखरांच्या कुंचलपाद जातीतील ‘पट्टेरी रुईकर’ नावाचे फुलपाखरू विषारी म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या पंखावर वाघाच्या अंगावर असतात तसे पट्टे असतात. हे फुलपाखरू भारतात सर्वत्र आढळते. साधारण: मध्यम आकाराच्या फुलपाखरांच्या पिवळ्या पंखांवर काळे पट्टे असतात. अमेरिकेत आढळणाऱ्या ‘मोनार्च’ या फुलपाखराशी याचे बरेच साम्य आहे. नर व मादी दोन्ही फुलपाखराचे पंख सारखेच असतात.ज्या वनस्पतीचे पान किंवा देठ तोडल्यास दुधासारखा पदार्थ स्रवतो, अशा वनस्पतीना आपण दुधी वनस्पती म्हणतो. ‘रुई’ ही त्यातीलच एक वनस्पती. ‘पट्टेरी रुईकर’ या फुलपाखरांच्या माद्या ‘रुई’च्या झुडुपावर अंडी घालतात. अंड्यामधून बाहेर येणारे सुरवंट हे काळ्या रंगाचे असतात. त्यांच्या अंगावर पांढºया-पिवळ्या रेषा व ठिपके असतात. सुरवंटची वाढ झाल्यावर ते कोषात स्वत:ला गुंडाळून घेतात. हे सुरवंट रुईच्या झाडाची पाने खाऊनच उपजीविका करतात. त्यामुळे रुईतील विषारी द्रव्य सुरवंटाच्या व पर्यायाने फुलपाखराच्या शरीरात जमा होतात. म्हणजेच रुई या वनस्पतीमधील विषाचा अंश पक्ष्याच्या शरीरात जाणारच. जर का हे फुलपाखरू एका चिमणीने किंवा बुलबुल पक्ष्याने खाल्ले तर ते विष पक्ष्याला इजा होण्याइतपत पुरेसे आहे. म्हणून सहसा असे पक्षी या फुलपाखरापासून सावध असतात.फुलपाखरे दिसायला सुंदर असतात एवढी जनमानसात त्यांची ओळख आहे. पण फुलपाखरांचे त्याही पलीकडे एक चमत्कारिक विश्व दडलेले आहे आणि त्यांचे विषारी असणे, हेही आश्चर्यच आहे. ते चावत नाहीत आणि त्यांना दातही नसतात. अनेक पक्षी फुलपाखरे आवडीने खातात. विशेषत: विणीच्या काळ्यात पिल्लाना भरविण्यासाठी पक्षी खास करून फुलपाखरांना भक्ष्य करतात कारण त्यातून अधिक ऊर्जा मिळते, असे मानले जाते. वेडा राघू, कोतवाल व इतर अनेक पक्षी फुलपाखरे आवडीने खातात. मात्र वनस्पतीतून शरीरात आलेले हे विष फुलपाखरांसाठी वरदान ठरते.- यादव तरटे पाटील, सदस्स, राज्य वन्यजीव मंडळ

टॅग्स :wildlifeवन्यजीव