शहरं
Join us  
Trending Stories
1
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
2
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
3
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
4
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
5
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
6
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
7
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
8
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
9
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
10
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
11
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
12
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
13
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
14
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
15
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
16
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
17
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
18
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
19
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
20
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
Daily Top 2Weekly Top 5

यश, अनुष्का विदर्भात ‘टॉप’

By admin | Updated: May 27, 2014 01:47 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल सोमवारी अधिकृतरीत्या जाहीर झाले. यात उपराजधानीतील भवन्स

सीबीएसई बारावी निकाल : विद्यार्थिनींचाच वरचष्मा

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल सोमवारी अधिकृतरीत्या जाहीर झाले. यात उपराजधानीतील भवन्स बी.पी. विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर येथील यश अरुण कोटेचा व अनुष्का रवी गुप्ता या दोघांनी विदर्भात अव्वल स्थान पटकाविले आहे. विशेष म्हणजे हे दोघेही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असून त्यांना प्रत्येकी ९८.४ टक्के गुण मिळाले आहेत. नागपूर जिल्ह्यातून दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. विज्ञान शाखेतून नागपुरातील सेंटर पॉईन्ट , काटोल रोड येथील शशांक शिवानंद या विद्यार्थ्याने ९७.८ टक्के गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला आहे. भवन्स बी.पी. विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर येथीलच चारु लवालिया हिने ९४.८ टक्के गुणांसह ‘ह्युमॅनिटीज्’मध्ये प्रथम स्थान पटकावले आहे.(प्रतिनिधी)