गिट्टीखदानमधील कुंटणखान्यावर धाड

By Admin | Updated: June 13, 2015 02:56 IST2015-06-13T02:56:59+5:302015-06-13T02:56:59+5:30

गिट्टीखदानमधील कुंटणखान्यावर धाड घालून गुन्हेशाखेच्या पथकाने एका महिलेला अटक केली.

The yardstick in the Gittikhadan | गिट्टीखदानमधील कुंटणखान्यावर धाड

गिट्टीखदानमधील कुंटणखान्यावर धाड

स्वत:च्या मुलीकडून वेश्याव्यवसाय : गुन्हेशाखेची कारवाई
नागपूर : गिट्टीखदानमधील कुंटणखान्यावर धाड घालून गुन्हेशाखेच्या पथकाने एका महिलेला अटक केली. अनिता योगीराज टेंभुर्णे (वय ३९, रा. कृष्ण नगर, आयबीएम रोड, नागपूर ) असे तिचे नाव आहे. आई आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. मात्र, अनिताने आपल्या सख्ख्या मुलीलाच वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलल्याचे उघड झाले.
अनिता गेल्या अनेक दिवसांपासून कुंटणखाना चालवते. तिच्याकडे ग्राहकांची भली मोठी यादी आहे. एका ग्राहकाकडून दुसऱ्या ग्राहकाचा संबंध जोडत तिने आपले नेटवर्क व्यापक केले आहे. पैशासाठी हपापलेल्या अनिताने बाहेरच्या महिला, मुलींसोबत स्वत:च्या पोटच्या मुलीलाही वेश्याव्यवसायात ढकलले आहे. ही माहिती कळाल्यावर गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून अनितासोबत संपर्क साधला. पैशाच्या बदल्यात तिने देहविक्रय करणारी तरुणी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. आज दुपारी ठरल्याप्रमाणे बनावट ग्राहकाने अनिताच्या हातात पैसे ठेवले. अनिताने त्याला एक तरुणी दिली. रुममध्ये जाताच ग्राहकाने पोलिसांना संकेत दिले. त्यानुसार पोलिसांनी अनिताच्या कुंटणखान्यावर धाड घातली. अनिता आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या ‘त्या‘ तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिची माहिती काढली असता पोलीसही चक्रावले. ती अनिताची मुलगी असल्याचे आणि पैशासाठी तिची आईच तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी अनिताला अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

Web Title: The yardstick in the Gittikhadan