लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हातावर इंग्रजीत ‘कट’ लिहून एका हुशार विद्यार्थिनीने गळफास घेतला. ही घटना बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दींतर्गत नरेंद्रनगर येथे घडली.मानसी अशोक जोनवाल (१७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मानसीने बारावी उत्तीर्ण केली आहे. महाविद्यालयात प्रवेशासाठी तिने सुरुवातीला अर्ज केला होता. तिला ७२ टक्के गुण मिळाले होते. मनपसंत कॉलेजात प्रवेश न मिळाल्याने तिने ‘ड्रॉप’ घेतला होता. तेव्हापासून ती घरीच होती. मानसीला मांजर पाळण्याचा शौक होता. आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. घराच्या छतावर तिच्यासाठी एक स्वतंत्र खोली होती. मानसीचा बहुतांश वेळ तिच्या खोलीतच जात होता. मोबाईलवर गेम्स खेळण्याचाही तिला छंद होता. मंगळवारी सायंकाळी मानसीने आपल्या खोलीत गळफास घेतला. रात्री ७.३० वाजता तिचे वडील जेव्हा तिच्या खोलीत गेले तेव्हा गळफास घेतल्याचे उघडकीस आले. मानसीने ओढणीने गळफास घेतला होता. शेजाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. मानसीने गळफास घेण्यापूर्वी हातावर पेनाने ’कट’ असे लिहिले होते. खोलीत कुठलेही सुसाईड नोट सापडली नाही. मानसीने अचानक आत्महत्या केल्याने परिसरातील लोकही आश्चर्यचकित आहेत. मानसीच्या आईची प्रकृती खराब राहते. आत्महत्येमुळे वडिलांनाही प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनाही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.याचप्रकारे संन्यालनगर जरीपटका येथील ३२ वर्षीय सतीश मुळे आणि गरोबा मैदान लकडगंज येथे राहणाºया ३१ वर्षीय रमा कार्तिक मेश्राम यांनीही गळफास घेतला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
हातावर ‘कट’ लिहून विद्यार्थिनीने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:52 IST
हातावर इंग्रजीत ‘कट’ लिहून एका हुशार विद्यार्थिनीने गळफास घेतला. ही घटना बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दींतर्गत नरेंद्रनगर येथे घडली.
हातावर ‘कट’ लिहून विद्यार्थिनीने घेतला गळफास
ठळक मुद्दे नागपुरातील बेलतरोडी परिसरात हळहळ