शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपाशातून सोडविण्याचे कार्य अखंड राहावे

By admin | Updated: May 23, 2015 02:54 IST

शिक्षण क्षेत्रात काम करताना मुलांच्या पालकांना दारूचे व्यसन असल्याचे कळते. त्याचे वाईट वाटते. दारूचे व्यसन असणाऱ्या पालकांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास नसतो.

रवींद्र फडणवीस : ‘अल्कोहोलिक अ‍ॅनानिमस’चा ११ वा वर्धापन दिन नागपूर : शिक्षण क्षेत्रात काम करताना मुलांच्या पालकांना दारूचे व्यसन असल्याचे कळते. त्याचे वाईट वाटते. दारूचे व्यसन असणाऱ्या पालकांच्या मुलांमध्ये आत्मविश्वास नसतो. त्यांचे अभ्यासातही लक्ष लागत नाही आणि काही मुले तर घरातील आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडण्याचाही निर्णय घेतात. पालकांच्या दारूच्या व्यसनाने घराची वाताहत होते, हे अनेकदा अनुभवायला येते. त्यामुळेच ‘अल्कोहोलिक अ‍ॅनानिमस’ संस्था करीत असलेले कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. लोकांना मद्यपाशातून सोडविण्याचे हे कार्य अखंड चालत राहणे निकोप समाजासाठी आवश्यक असल्याचे मत रवींद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘अल्कोहोलिक अ‍ॅनानिमस’ संस्थेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर टी, राजेश एम, मोहन आर प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम हिंदू मुलींची शाळा, महाल येथे आयोजित करण्यात आला. फडणवीस म्हणाले, ही मुलींची शाळा आहे. अनेक पालकांना दारूचे व्यसन असल्याने मुली तणावात राहतात. दारूमुळे घरातही आर्थिक चणचण निर्माण होते आणि त्याचा मुलांवर परिणाम होतो. त्यामुळेच दारुचे व्यसन सोडविण्यासाठी असलेले संस्थेचे हे काम नव्या पिढीलाही उपकारक आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी सतीश के यांनी संस्थेचा इतिहास सांगितला. मोहन के आणि प्रकाश आर यांनी त्यांचे अनुभव सांगितले. दारू पिणे हा एक आजार आहे. हा आजार बरा होणारा नाही पण त्यावर उपाय मात्र आहेत. दारू सोडण्याचा विचारही करू नका पण आजचा दिवस दारू पिणार नाही, असे प्रत्येक दिवशी ठरवा. याच पद्धतीने अनेक लोक दारूपासून दूर झाले आहेत. राजू पी यांनीही यावेळी अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पराग डी यांनी तर आभार ज्ञानेश्वर टी यांनी मानले. (प्रतिनिधी)