शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महिला ही समाजातील मोठी शक्ती!

By admin | Updated: April 25, 2016 02:52 IST

महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहे. मुळातच महिला ही समाजातील फार मोठी शक्ती आहे.

सोनार समाजाचा महिला मेळावा : नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नागपूर : महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहे. मुळातच महिला ही समाजातील फार मोठी शक्ती आहे. सोनार समाजाच्या या मेळाव्याने महिलांना एक दुसऱ्याशी जोडण्याचे काम केले आहे. समाजातील महिलांनी डॉ. स्मिताताई कोल्हे यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते व जहाजबांधणी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सोनार समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘सुवर्णालंकार’ या मासिकाच्यावतीने रविवारी राज्यस्तरीय सोनार महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून गडकरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे होते. अतिथी म्हणून नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैश्य सुवर्णकार समाजाचे दत्तात्रय वझरकर, सुवर्णालंकार मासिकाचे मुख्य संपादक प्रकाश माथने, सुरेश आसरे, भाजपच्या महिला आघाडी महासचिव माया हाड, देवेंद्र शेरेकर व मुकुंदराव शहाने उपस्थित होते. यावेळी गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे, विजयराव फळणीकर व साधना फळणीकर यांना ‘सोनार गौरव पुरस्कार’ प्रदान करून, त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सोनार समाजातील इतर ३० कर्तृत्ववान महिलांचा सुद्धा गौरव करण्यात आला. यावेळी बावनकुळे यांनी आपल्या भाषणातून हा सोनार समाजातील महिलांचा अभुतपूर्व मेळावा असल्याचे सांगितले. शिवाय त्यांनी सोनार समाजातील महिलांनी या मेळाव्यातून प्रेरणा घेऊन पुढे यावे, असेही सांगितले. या कार्यक्रमाला सुचिता रोकडे, माला रोकडे, नीता बांगरे, माला रोकडे, भारती अडमकर, विद्या कावळे, पूजा सांगुळले व सुलभा माथने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन अनिल मालोकर व कांचन भुताळ यांनी केले. प्रकाश माथने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)