शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा सन्मान व्हावा

By admin | Updated: January 11, 2016 02:56 IST

महिलांचा मान-सन्मान झाला, तर समाजाचा सन्मान होईल. त्यामुळे प्रत्येक समाजात महिलांचा सन्मान झाला पाहिजे,

सर्व भाषीय कलार समाजाचा मेळावा: सुदीप जायसवाल यांचे प्रतिपादन नागपूर : महिलांचा मान-सन्मान झाला, तर समाजाचा सन्मान होईल. त्यामुळे प्रत्येक समाजात महिलांचा सन्मान झाला पाहिजे, असे प्रतिपादन शहरातील प्रसिद्ध विधीतज्ज्ञ अ‍ॅड़ सुदीप जायसवाल यांनी केले. सर्व भाषीय कलार समाज ट्रस्टच्यावतीने रविवारी आयोजित युवक-युवती परिचय मेळावा आणि समाज महासंमेलनात ते बोलत होते. रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवनात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी केंद्र सरकारच्या केंद्रीय पर्यटन सल्लागार परिषदेचे सदस्य चंद्रपाल चौकसे होते. अतिथी म्हणून रवींद्र दुरुगकर, मोहनसिंह अहलुवालिया, जयनारायण चौकसे, त्रिलोकीनाथ शिवहरे, ओ. पी. जायसवाल, नारायणराव टाले, नरेंद्र वासेकर व सर्व भाषीय कलार समाज ट्रस्टचे अध्यक्ष फाल्गुन उके उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अ‍ॅड़ जायसवाल पुढे म्हणाले, समाजात एकता निर्माण करण्यासाठी प्रथम स्वत:च्या घरात एकता आणली पाहिजे. तसेच युवक -युवतींच्या परिचय मेळाव्यासह ज्यांचे जीवनसाथी वेगवेगळ््या कारणांमुळे दुरावले आहेत, अशा महिला व पुरुषांसाठीही परिचय मेळाव्यांचे आयोजन व्हावे, अशी त्यांनी यावेळी भावना व्यक्त केली. रवींद्र दुरुगकर यांनी युवक-युवती परिचय मेळाव्यांसह सामुहिक विविध सोहळ््यांचे सुद्धा आयोजन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. सोबतच जेव्हापर्यंत कलार समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही. त्यामुळे समाजाने आपल्या आर्थिक विकासाकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. तसेच कलार समाज हा संपूर्ण देशभरात विखुरला असल्याचे त्यांनी स्पष्ट करू न त्या सर्व समाजाला एकजूट करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. या मेळाव्यात संपूर्ण राज्यातील शेकडो तरुण-तरुणी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. संचालन अ‍ॅड. सुर्यकांत जायसवाल व ओमकार सुर्यवंशी यांनी केले. (प्रतिनिधी)