नागपुरात टिप्परच्या धडकेत महिला ठार, मुलगी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 21:03 IST2020-07-17T21:02:11+5:302020-07-17T21:03:47+5:30
भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे अॅक्टिव्हा चालक युवती गंभीर जखमी झाली तर तिच्या आईचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ८.४५ च्या सुमारास पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.

नागपुरात टिप्परच्या धडकेत महिला ठार, मुलगी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे अॅक्टिव्हा चालक युवती गंभीर जखमी झाली तर तिच्या आईचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ८.४५ च्या सुमारास पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.
करुणा ज्ञानेश्वर कांबळे (वय ४१) असे मृत महिलेचे नाव आहे तर जखमी युवतीचे नाव महिमा ज्ञानेश्वर कांबळे (वय १७) आहे. महिमा तिच्या आईला घेऊन गुरुवारी रात्री आजीच्या घरी जात होती. एचपी टाऊन जवळ टिप्पर चालक आरोपी मोहम्मद अली कलामउद्दीन अन्सारी याने निष्काळजीपणे दुचाकी चालवून महिमाच्या दुचाकीला धडक दिली त्यामुळे करुणा यांचा मृत्यू झाला तर महिमा गंभीर जखमी झाली. मिळालेल्या तक्रारीवरुन पारडी पोलिसांनी अपघाताची नोंद केली पुढील तपास सुरू आहे.
जखमी तरुणाचा मृत्यू
दुचाकी घसरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या दोन पैकी एका तरुणाचा मृत्यू झाला. शुभम बंडोजी गोंडुळे (वय २०) असे मृताचे नाव आहे. पारडी भरतवाडा येथे राहणारा शुभम आणि त्याचा मित्र योगेश बबनराव राऊत ( वय २८) हे दोघे दुचाकीने १२ जुलै च्या रात्री ८ च्या सुमारास बजाज नगर परिसरातून जात होते. शंकरनगर बस थांब्याजवळ शुभमने भरधाव दुचाकीचे करकचून ब्रेक मारल्याने दुचाकी खाली पडली. त्यामुळे शुभम गंभीर जखमी झाला. त्याला मेडिकलच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी १६ जुलैच्या सकाळी शुभम गोंधळे याला मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून बजाजनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.